Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी ०६, २०२३

टूथपेस्टला शेवटी असणाऱ्या वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्यांचा अर्थ काय असतो? toothpaste

टूथपेस्टला शेवटी असणाऱ्या वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्यांचा अर्थ काय असतो?

 सकाळी आपण उठल्यानंतर आधी दातांची सफाई करतो. त्यावेळी आपल्या हातात ब्रश आणि टूथपेस्ट असते. मात्र आपण जो टूथपेस्ट वापरतो, तो आपल्या दाताला हानिकारक आहे का किंवा फायदेशीर आहे का, याचा विचार कधी करत नाही. विविध कंपन्यांचे toothpaste वापरताना ते कशापासून बनले आहे. त्यामध्ये नेमके कोणते घटक मिश्रित आहे, याची सुद्धा माहिती आपण देत नाही. त्यामुळे दातांचे आजार वाढतात. अनेक पुस्तक विविध रंगपट्ट्या दिलेल्या असतात. त्यांचे महत्त्व देखील आपण समजून घेत नाही. 


आपण दररोज वापरत असलेल्या टूथपेस्टमध्ये निळ्या, काळा, हिरवा किंवा लाल पट्टे असू शकतो. या पट्टे त्या टूथपेस्टची रासायनिक रचना खालीलप्रमाणे दर्शवितात:


टूथपेस्ट
टूथपेस्ट


१. काळी पट्टी : अशी पट्टी असलेल्या टूथपेस्ट मध्ये फक्त रासायनिक घटक असतात. सहसा असे टूथपेस्ट वापराने टाळावे.

२. निळी पट्टी : ह्या मध्ये नैसर्गिक आणि औषधी घटक असतात.

३. लाल पट्टी: ह्या मध्ये नैसर्गिक आणि रासायनिक घटकांचे मिश्रण असते .

हिरवी पट्टी: ह्या मध्ये सर्व नैसर्गिक घटकांचा समावेश असतो.

त्यामुळे दुकानातून toothpaste खरेदी करताना आता कोणता घ्यायचा हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.