शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाचा? Thackeray Vs Shinde या ठाकरे आणि शिंदे गटाच्या दाव्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगात आज शुक्रवारी (दि. २०) महत्त्वाची सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. शिंदे गटाकडून महेश जेठमलानी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर बाजू मांडली. (Shiv Sena Symbol Row) सोमवारी म्हणजेच 23 जानेवारीला लेखी उत्तर द्या असं निवडणूक आयोगानं दोन्ही गटाला सांगितलं आहे. तसेच पुढील सुनावणी किंवा अंतिम निर्णय ३० जानेवारीला होणार आहे.
Now judgement on symbol " Bow and Arrow" will be on Monday 23 January, Birth Anniversary of #BalasahebThackeray. What a coincidence?
शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाचा? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीदरम्यान दोन्ही गटाकडून आयोगासमोर जोरदार युक्तीवाद करण्यात आला. याच दरम्यान, महेश जेठमलानी आणि देवदत्त कामत यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचे समोर आले आहे. प्रतिनिधी सभेच्या युक्तीवादावरून जेठमलानी आणि कामत यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. Maharashtra Politics Crisis
आजच्या सुनावणीवेळी आमच्याकडे बहुमत असल्याचा शिंदे गटाचा दावा ठाकरे गटाकडून खोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या अन्यथा निवडणूक घ्या असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. यावेळी विधीमंडळ आणि राजकीय पक्षाची सिब्बल यांनी तुलना केली. शिंदे गटाची प्रतिज्ञापत्र तपासून पहा, अशी मागणी सिब्बल यांनी केली. दरम्यान, सिब्बल यांनी शिवसेनेची घटना निवडणूक आयोगासमोर सादर केली. सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून एक तासांहून अधिक वेळ युक्तिवाद केला. यावेळी पक्ष प्रमुख पदाला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली.