Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी १७, २०२३

गुरुदक्षिणा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा Gurudakshina Calendar Release Ceremony



जुन्नर /आनंद कांबळे
वैष्णवधाम ( ता. जुन्नर) येथील आशापूर्ती ग्रामवैभव सभागृहात स्व. राजेंद्र रघुनाथ पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुरुदक्षिणा सोशल वेल्फेअर फाउंडेशन व लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. पवार यांच्या जीवनातील आठवणींना उजाळा देण्यासाठी शोकसभेचे आयोजन केले होते.ते संस्थेचे खजिनदार होते. 

गुरुदक्षिणा सोशल फाउंडेशन च्या मदतीने दरवर्षी शालेय गरजू ,गरीब, निराधार विद्यार्थ्यांना मदत करणे, शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे, वंचित, अनाथ,निराधार , ज्येष्ठांना काठी वाटप, साड्या वाटप, त्याचप्रमाणे मोफत आरोग्य शिबीर भरविणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे, असे शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवले जातात. 

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठ सदस्या आशाताई बुचके यांच्या हस्ते व लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी चे अध्यक्ष ला. संतोष रासने , विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, शिवनेरी लायन्स फाउंडेशनचे अध्यक्ष शिरीष जठार, वैष्णवधामचे सरपंच सुदाम डेरे,उपसरपंच सुरेश गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसनराव गायकवाड, विकास सोसायटीचे चेअरमन दगडू पवार ,श्री ब्रह्मनाथ सेवा मंडळाचे संचालक भगवान पवार, गुरुदक्षिणा फाउंडेशनचे अध्यक्ष एफ. बी .आतार कार्याध्यक्ष संतोष गायकवाड, सेक्रेटरी आदिनाथ चव्हाण, सहसचिव स्वाती मुळे, संचालिका विजया निमसे, शुभांगी तळेकर,राजेंद्र भोर, संतोष चव्हाण, त्याचबरोबर लायन क्लब चे सचिव विश्वास भालेकर,जयहिंद शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, प्रथम अध्यक्ष योगेश जुन्नरकर, नरेंद्र गोसावी, ऍड. हेमंत भास्कर, डॉ. चेतन कर्डिले, शशीभाऊ वाजगे, डॉ.लोकेश खोत, डॉ.राहुल पवार, डॉ.तुषार पानसरे, जितेंद्र काळे आदी मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचा शुभारंभ स्व.राजेंद्र पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक फकीर आतार तर सूत्रसंचालन स्वाती मुळे यांनी केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.