Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी १३, २०२३

हिरो, हिरोहिनला पाहण्यासाठी इथे उसळली प्रचंड गर्दी

सांस्कृतिक, क्रीडा, कृषी,शैक्षणीक याचा वारसा जपणाऱ्या ब्रम्हपुरी महोत्सवाचे थाटात उद्घाटन पार पडले. याप्रसंगी प्रामुख्याने उद्घाटक म्हणुन प्रसिध्द सिने अभिनेता सोनू सूद, विशेष अतिथी सिने अभिनेते, असरानी, प्राजक्ता माळी,प्रमूख अतिथी म्हणून आ. सुभाष धोटे, किरण विजय वडेट्टीवार, युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, संपादक श्रीपाद अपराजित,माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी जिल्हा बँक अध्यक्ष संतोष रावत, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, ॲड.राम मेश्राम, नगराध्यक्ष रिता उराडे , व ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, व इतर मान्यवर उपस्थित होते.

#bramhapuri #bramhapurimahotsav2023

सोनू सूद , प्राजक्ता माळी, आदिती गोवित्रीकर यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी...




सिने अभिनेते सोनू सुद यांची चित्रपटसह कोरोना काळात दाखविलेली सह हृदायता यामुळे प्रचंड लोकप्रियता यामुळे ते चाहता वर्गाच्या गळ्यातील ताईत बनले. सोबतच ज्येष्ठ अभिनेते असराणी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी, सिने अभिनेत्री आदिती गोवित्रीकर, यांना बघण्यास प्रचंड गर्दी उसळली होती.

कृषी महोत्सवाने वेधले नागरिकांचे लक्ष :
ब्रम्हपुरी महोत्सव 2023 च्या पहिल्या दिवशी तालुक्यासह दूर वरून आलेल्या नागरिकांना कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी विशेष असे विवीध स्टॉल लावून आधुनिक तंत्रज्ञाननानातून शेती, शेती पूरक व्यवसाय याबद्दल अधिकाधिक माहिती देऊन याचा नागरीकांना शेती व्यवसायातून प्रगती यांचे महत्त्व पटवून दिले.

#bramhapuri #bramhapurimahotsav2023

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.