अर्चना खामणकर यांचे निधन
दत्त नगर, गजानन मंदिर चौक, नागपूर रोड, चंद्रपूर येथील अर्चना खामणकर- वैरागडे यांचे आजाराने निधन झाले. त्या 43 वर्षाच्या होत्या.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 2 रामनगर येथे ए.एन. एम. कंत्राटी कर्मचारी म्हणून 2006 पासून त्या कार्यरत होत्या. मागील काही दिवसांपासून त्या एका दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या. दिनांक 01 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, 2 मुली, सासू, सासरे व बराच मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर 2 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार चंद्रपूर येथे होईल.