राष्ट्रीय किसान नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) व किसान संघर्ष समिति अध्यक्ष मा. सुनीलम यांची जाहीर सभा नागपूर येथे बुधवार दि. ११ जानेवारी २०२३ आयोजित करण्यात आली आहे.
देशात २०२०-२१ हे वर्ष भारताच्या शेतकरी आंदोलनातील ऐतिहासिक वर्ष होय. कारण याच वर्षी शेतकरी विरोधी काळया कायद्याच्या विरोधात हजारो शेतकरी आंदोलनात उतरले होते. मंडी पास उन्हात रस्त्यावर आंदोलन करत होते. भारतीय शेतकऱ्यांचे जिने हे अतोनात कष्ट व वासांनी भरलेले आहे. ही स्थिती आजची नसून कित्येक पिया पासूनची आहे. 1873 सात्मा फुले यांनी शेतकन्याचा आसूड' मधे शेतक-यांची जी हलाखीची परिस्थिती मांडली होती ती आणि आज या परिस्थितीमधे व शेतकयांच्या दैन्यवान्या स्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. आणि म्हणून आजही वकल्यांना त्याच कष्टी जीवनी दुखात जगावे लागते. इथली जी सत्ता होती किंवा आहे ती शेतकऱ्यांनी वर यावे, त्यांच्या पुदीन पियावरी जीवघेण्या कटातून मुक्त व्हाव्या यासाठी नसून ते त्याच कश्टी जीवनात राहावे ही नीती राबवली व आजही तीच नीती राबवली जात आहे. इमली सत्ता शेतकऱ्यांना नीच समजते. शूद्र संबोधते आणि म्हणून इथली सत्ता सतत भटशेउवादी नीती राबवते बळीराजाला जेव्हा वामनाने पाताळात घातले तीच भूमिका, शेतकऱ्यांना दाबून ठेवण्याची नीती आजचे सत्ताधारी घेताना दिसतात. शेतकऱ्यांनी मागील वर्ष भर जे आंदोलन केले त्याचा कशा प्रकारे विरोध झाला, कशा प्रकारे बदनाम करण्यात आले व कसकसा छळ करण्यात आला हे देशभरातील लोक व सर्व जग जाणते. हा त्रास व चळकरण्यात आला तो या शेतकन्यांना हिंदू म्हणणाऱ्या कडून. याचा अर्थ इथली सत्ता त्या लोकांच्या सुखासाठी आहे जे सत्ताधारी जात-वर्गातले आहेत आणि त्याच मानसिकतेत असलेले आहेत. हे किसान आंदोलन शेतकल्यांना बरे दिस येण्यासाठी, न्यायासाठी होते. वामनी वृत्तीच्या मनमानी विरुद्ध होते. या कायद्यामुळे शेतकरी आणखी दुःखात जाणार होता किंवा शेतकल्यांच्या मालाला योग्य भाव आजवर कधीच मिळाला नाही त्या विरोधात होते. शेतकऱ्यांना गरिबीत ठेवण्याच्या नीयती विरुद्ध होते. सरकार दखल घेत नाही यावर उपाय शोधत नाही म्हणून हे किसान आंदोलन सुरू झाले. सरकारने शेतकऱ्यांचे हित न पाहता व्यापाऱ्यांचे आणि भांडवलदारांचे हितासाठी हे कायदे केले होते. शेतकरी किसानांना उपेक्षित धन दांडग्या लोकांच्या तुंबड्या भरण्यासाठी त्यांना आणखी धनवान करण्यासाठी कायदे केले आहेत. सरकारी नीती ही शेतकऱ्यांच्या हिताची राहू नये, वरच्या सामाजिक व आर्थिक दृष्ट्या कसबी, दांडग्या लोकांसाठी राहावी अशासाठी सरकार रावते. याच स्थितीमुळे भारतामध्ये आजवर दोन लाखावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आणि पुढेही सुरू राहणार कारण सत्ताधाऱ्यांची नीती आणि नियत तीच राहणार आहे. किसान मोर्चाचे लोकांनी 14 महिने पर्यंत जे आंदोलन दिल्लीला धक्के देण्यासाठी केले त्या आंदोलनाचे एक प्रमुख नेते मा. राकेश टिकैत यांचा कार्यक्रम बुधवार दि. ११ जानेवारी २०२३ ला वेळ दुपारी १ वाजता
नागपूर येथे देशपांडे सभागृहात (आमदार निवासा समोर) आयोजित करण्यात आला आहे. सर्व शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या भावावहिनींना आवाहन आहे की या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन नागेश चौधरी व संयोजन समिती सदस्य बहुजन संघर्ष समिती यांनी केले आहे.
Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU
.