Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर १३, २०२२

जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु होणार । jalyukt Shivar Abhiyaan Maharashtra government

 

जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु होणार । jalyukt Shivar Abhiyaan Maharashtra government
जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु होणार । jalyukt Shivar Abhiyaan Maharashtra government

 
भारताच्या महाराष्ट्र राज्यात नेहमीच होणाऱ्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन 'पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९' या योजनेअंतर्गत 'जलयुक्त शिवार'  jalyukt Shivar  नावाचे एक अभियान महाराष्ट्र सरकारने २०१४ सालच्या डिसेंबरमध्ये सुरू केले. 

Jalyukt-Shivar । Maharashtra government has launched the project "Jalyukt Shivar Abhiyaan" in a bid to make Maharashtra a drought-free state by 2019.

 

मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने शेतीसाठी उपयुक्त ठरलेली जलयुक्त शिवार  jalyukt Shivar ही महत्त्वाची योजना पुन्हा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून आपण या निर्णयाचे स्वागत करतोअशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.


ते म्हणाले कीतत्कालीन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण भाग आणि शेतीच्या विकासासाठी जलयुक्त शिवार  jalyukt Shivar  ही अत्यंत कल्पक आणि प्रभावी योजना सुरू केली. जनतेच्या सहभागातून ही योजना यशस्वी ठरली. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी राखण्यास मदत झाली आणि सिंचनाच्या क्षमतेत वाढ झाली. तथापि२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीने विजय मिळविला असताना विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवार या अत्यंत उपयुक्त योजनेला स्थगिती दिली. ही योजना बदनाम करण्याचाही प्रयत्न केला. तथापिआता पुन्हा ही  jalyukt Shivar योजना सुरू होत असल्याने ग्रामीण भाग आणि शेतीला लाभ होणार आहे. आपण या निर्णयाबद्दल शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन करतो.


त्यांनी सांगितले कीस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५,००० पदांच्या भरती प्रक्रियेला चालना देण्याचा निर्णय राज्यातील युवक युवतींसाठी आश्वासक आहे. पुणे जिल्ह्यातील शिवसृष्टी प्रकल्पाला पन्नास कोटी रुपये अनुदान देणे आणि वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात साठ टक्के वाढ करणे हे निर्णय स्वागतार्ह आहेत.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.