फेसबुकवर ५००० मित्र मर्यादा आहे. दररोज नवीन फ्रेंड्स रिक्वेस्ट येतात. अनेकजण अनफ्रेंड्स करतात. कोणी तुम्हाला अनफ्रेंड केले आहे, याची नोटिफिकेशन येत नाही. पण, तू,तुम्हाला खरोखर जाणून घ्यायचे असेल तर एक प्रक्रिया करून बघा. ही प्रक्रिया थोडी मोठी आणि किचकट आहे. परंतु, यावरुन सहज माहिती होऊ शकते की कोणी तुम्हाला अनफ्रेंड केले आहे. यासाठी तुम्हाला डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची गरज पडेल.
- सर्वात आधी तुम्हाला 'WhoDeleteMe'वर जावे लागेल.
- गुगल एक्सटेंशन वर सर्च करावे लागेल. ब्राउजरवर इंस्टॉल करा.
- सर्च करताच तुम्हाला समोर 'WhoDeleteMe'चे बटन दिसेल. त्यावर क्लिक करा.
- बटन दाबताच तुम्हाला 'See Who Deleted You Previously'वर क्लिक करावे लागेल.
- स्क्रीनवर ज्याने तुम्हाला अनफ्रेंड केले आहे. त्याची संपूर्ण यादी समोर येईल.