निफन्द्रा :-सावली तालुक्यातील निफंद्रा येथे रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरी करण्यात आली.
हिंदू धर्मातील महत्त्वाचे महाकाव्य रामायण महर्षी वाल्मिकी यांनी रचले होते. महर्षी वाल्मिकी यांची जयंती दरवर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. महर्षी वाल्मिकी यांची जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
या निमित्ताने निफंद्रा येथे महर्षि वाल्मीक ऋषी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी नमन केले.व गोपालकाला करण्यात आला नंतर गावात महर्षी वाल्मिकी यांची पालखी व शोभयात्रा काढण्यात आली त्यामध्ये श्री राम यांची भूमिका टिकेश समर्थ, लक्ष्मण यांची भूमिका व्यंकटेश मारभते, श्री हनुमान यांची भूमिका हिवराज गेडाम यांनी केली नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले
*या प्रस़ंगी जय वाल्मिकी मच्चीपालन सोसायटीचे अध्यक्ष हरिदास आगरे , ढिवर समाज अध्यक्ष विलास बावणे,विनोद मारभते,जीवन कांबळे,शामराव नागपुरे,विश्वनाथ नैताम,विलास भोयर, संतोष नागपुरे, पुरषोत्तम मेश्राम, अशोक मारभते,भूमिका रमेश मारभते, जगदीश मारभते, गिरधर मारभते, किसन गेडाम, प्रेमादास भोयर,सोमेश्वर मारभते व लक्ष्मी मारभते,आशा गेडाम, भारती जराते, पौर्णिमा जराते, दीपाली मारभते, वर्षा आगरे, तसेच समस्त ढिवर समाजाचे महिला व पुरुष, युवा कायकर्ते व बालगोपाल व निफंद्रा वासिय जनता व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.*