भाऊच्या दांडीयात ताईंचे दांडिया नृत्य
#khabarbat #india #chandrapur #live
चंद्रपूर शहरात मागील नऊ दिवसांपासून खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत भाऊचा दांडिया सुरू आहे. काल नवमीच्या रात्री खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दांडिया नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आमदार प्रतिभा धानोरकर गाण्यावर नृत्य करत असल्याचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गाण्यावर चांगलाच ठेका धरला. व्हिडीओमध्ये त्या महिलासोबत नृत्य करताना दिसत आहेत.
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोकर आणि वरोरा भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उत्सवात चंद्रपूर जिल्ह्यातील आणि शहरातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवून दांडियाची शोभा वाढवली. काल नवमीच्या रात्री खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दांडिया नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संगीत अमृतकर सहभागी झाल्या होत्या.
या खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत 'भाऊचा दांडिया' उत्सवानिमित्त आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यात दोन चॅम्पियन्स ला ई दुचाकी, व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. चांदा क्लब ग्राउंडवर ५ ऑक्टोबर २०२२ रोजीपर्यंत सायंकाळी सहा ते रात्रौ १० वाजता दांडियाची घूम राहणार आहे. यात दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत. या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी तथा मराठा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.