फोनवर हॅलोऐवजी ‘वंदे मातरम्‘ | vande mataram
चंद्रपुर : हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापूढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर होवून सांस्कृतिक खात्याची जवाबदारी येताच स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. 'Vande Mataram'
No more hello, the employees in the government offices across Maharashtra will start their tele-conversation with Vande Mataram. This was announced minutes after the BJP leader Sudhir Mungantiwar was made cultural affairs minister after the Chief Minister’s Office released the list of portfolios of the council of ministers. This aims to adhere to Swadeshi by giving goodbye to ‘’foreign’’ word hello, he noted.
सईद नुरी यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला
राज्य सरकारच्या शासकीय कर्मचाऱ्यांना वंदे मातरम म्हणण्याच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्याणावर रझा अकादमीने विरोध केला. रजा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला. आमच्यात फक्त अल्लाहची पूजा होते. म्हणून त्याऐवजी सरकारने काही दुसरा पर्याय द्यावा जो सर्वाना मान्य असेल. याबाबत आम्ही उलेमा आणि इतर संबंधितांशी चर्चा करून सरकारला पत्र लिहिणार असल्याचं रझा अकादमीचे सईद नुरी (Saeed Noori) म्हणाले. मुहम्मद सईद नूरी हे मुंबईतील रझा अकादमीचे भारतीय सुन्नी नेते, कार्यकर्ते, संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.
वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगान आहे. हा केवळ एक शब्द नसुन भारतीयांच्या भारतमाते विषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. १८७५ मध्ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्याकाळात स्वातंत्र्यासाठी लढणा-यांना उर्जा देण्याचं काम करत होते. ‘हे माते मी तुला प्रणाम करतो’ अशी भावना व्यक्त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्तीचे स्फुल्लींग चेतविले.
Mungantiwar said, ‘’The country is celebrating the 75th year of Independence and in accordance with its propriety it was decided that the government employees will no more use hello but start their telephonic conversation with Vande Mataram.’’
भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्या या रचनेतील एकेक शब्द उच्चारताच देशभक्तीची भावना जागृत होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्द त्यागत त्याऐवजी शासकीय कार्यालयांमध्ये यापूढे वंदे मातरम् म्हणत संभाषण सुरु करणार आहोत. १८०० साली टेलिफोन अस्तीत्वात आल्यापासून आपण हॅलो या शब्दाने संभाषण सुरु करतोय. आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् ने संभाषण सुरु करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यामंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. सांस्कृतिक कार्या विभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात येईल असेही श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
'Vande Mataram' is well known as the National Song of our country. Utterance of the words 'Vande Mataram' gave freedom fighters and the common public
वन्दे मातरम् या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार राष्ट्रीय गीत हा दर्जा मिळालेला आहे. हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचले आहे. इ.स. १८८२ मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये हे गीत लिहिले होते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणागीत बनले.
.
.........
पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा :
https://chat.whatsapp.com/JKzeUZ26WqjKc6GQfXtqjm