Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट २१, २०२२

१५०० हून अधिक गावांना ‘हर घर जल’ । More than 1,500 villages get ‘Har Ghar Jal’


Maharashtra News

महाराष्ट्रातील 1,513 गावांमधील प्रत्येक कुटुंबाला ‘हर घर नल से जल’ ‘Har Ghar Nal Se Jal मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी नळ कनेक्शन मिळाले.  नाशिक जिल्ह्यातील 111, गडचिरोलीतील 89, सातारा 79, अमरावती 78, चंद्रपूर 76, नागपूर 65, जालना 52, औरंगाबाद 42 आणि पालघर मधील 17 गावांमध्ये वैयक्तिक नळ जोडणी देण्यात आली.  



25 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान विशेष मोहिमेचा भाग म्हणून पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने (The department of water supply) राज्यातील 1,553 गावांपर्यंत पोहोचले होते आणि 1,513 गावांमधील सर्व घरांना जोडणी देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. नियमित पाणीपुरवठ्यासह नळ कनेक्शनमुळे लोकांना, विशेषत: स्त्रिया आणि मुलांना फायदा होईल. पूर्वी या गावांतील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप, विहिरी व इतर स्रोतांवर अवलंबून राहावे लागत होते. या योजनेंतर्गत 2024 पर्यंत सर्व ग्रामीण कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि गावपातळीवरील पाणीपुरवठा योजनांद्वारे नळाचे पाणी पुरविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्रातील जल जीवन मिशनचे (mission director of Jal Jeevan Mission) मिशन संचालक डॉ हृषिकेश यशोद (Dr Hrishikesh Yashod) यांनी दिली. 




Nashik । Gadchiroli ।  Satara। Amravati । Chandrapur । Nagpur।  Jalna । Aurangabad । Palghar


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.