अतिशय संघर्षमय जीवनातून राजकीय क्षेत्रात कर्तुत्वाचा ठसा उमटविणारा नेता म्हणून काँग्रेसचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार हे नाव सर्व दूर परिचित आहे. गोंडपीपरी तालुक्यातील मुळगाव करंजी हे आ. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांचे जन्मगाव होय.
वडिलांचे छत्र हरपल्यानंतर जन्मभूमीचा त्याग करून आ. विजय वडेट्टीवार यांनी वसंत शाळा, गडचिरोली येथे 1979 मध्ये 10 वीचे शिक्षण घेतले. गडचिरोली येथून राजकीय क्षेत्रात मुहूर्तमेढ केली. १९९६-९८ मध्ये युतीचे सरकार असताना ते वनविकास महामंडळाचे चेअरमन होते. २००४-०९ या काळात शिवसेनेकडून विधान परिषदेचे सदस्यत्व मिळाले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan RANE ) यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००४-०९ या काळात त्यांनी कॉंग्रेसतर्फे चिमूरची निवडणूक लढवून विजय संपादन केला. याच काळात त्यांना राज्यात ऊर्जा, सिंचन, आदिवासी कल्याण, पर्यावरण व वन राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. अशोक चव्हाण यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रिपद आल्यानंतर त्यांच्या सरकारमध्ये २००९-१० मध्ये त्यांच्याकडे सिंचन, ऊर्जा, वित्त व नियोजन, संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून काम केले. विशेष म्हणजे, मोदी लाटेतही ते २०१४ मध्ये चिमूरऐवजी ब्रम्हपुरी या शेजारच्या मतदारसंघातून निवडणूक लढून विजयी झालेत. त्यामुळे त्यांचे पक्षात वजन वाढले होते. विधानसभेत ते पक्षाचे प्रतोदही होते. विखे पाटील भाजपवासी झाल्यानंतर कॉंग्रेसने त्यांना विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद दिले होते. यानंतर राजकीय भवितव्यात कधी मागे वळून न पाहणारा नेता म्हणून त्यांचे राजकीय अस्तित्व उदयास आले. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) हे विद्यमान आमदार व माजी कॅबिनेट (2021) मंत्री आहेत. विजय वडेट्टीवार हे चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आलेत. अशातच आ. वडेट्टीवार यांची महाविकास आघाडीच्या मागील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्रीपदी वर्णी लागली. महाराष्ट्राचे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
सत्तेत येतात एक सक्षम व कर्तबगार नेतृत्व म्हणून त्यांनी कोरोना या वैश्विक महामारी संकट काळात आपत्ती व्यवस्थापन खात्याची यशस्वीरित्या धुरा सांभाळून राज्यावरील संकटाशी लढा दिला. सोबतच संपूर्ण जिल्ह्यात विकास कामांचा झंजावातही सुरूच ठेवला.
अडीच वर्षाच्या कालांतराने राज्यात सत्ता बदल होताच चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजविला व नदी , नाल्यांना पूर येऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह , जनसामान्यांनाही पुराने हैराण करून सोडले. सत्ता खुर्ची गेली असली तरी जनसेवेच्या ऋणानुबंधाचा वसा अविरत सुरू ठेवत शेतकरी व जनसामान्यांच्या हाकेला धावून जात जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असताना गोंडपिंपरी तालुक्यातील राजुरा विधानसभा क्षेत्र आमदार सुभाष धोटे यांचे सोबत पूर परिस्थितीचा आढावा घेत तोहोगाव येथे गेले असता साहिल काशिनाथ वाघाडे या तरुण मुलाच्या पूर सदृश्य परिस्थितीत उपचार अभावी दुर्दैवी अंताची मन सुन्न करणारी घटना कानावर पडली. तत्पूर्वी साहीलची बहिण हिचा देखील मृत्यू काही महिन्यांपूर्वी झाला. एकाच कुटुंबातील सलग दोन अपत्यांवर काळाचा आघात होऊन निसंतान झालेल्या वाघाडे कुटुंबियांची क्षणाचाही विलंब न करता त्वरित भेट घेऊन तालुक्याचा भूमिपुत्र या नात्याने आ. विजय वडेट्टीवार यांनी दुःखाच्या प्रसंगी वाघाडे दाम्पत्याचे सांत्वन करून व्यथा जाणून घेत आर्थिक मदत दिली.
आजही राज्याच्या सत्ताकारणातील आ.विजय वडेट्टीवार हे कर्तुत्ववान नेतृत्वाची नाळ जन्मभूमीच्या मातीशी जुडून असुन जन्मभूमी प्रति ऋणानुबंधाचे नाते हे कायम असतात याची प्रत्यक्ष अनुभूती नागरिकांना झाली.
गेल्या दहा दिवसात सर्वत्र धो -धो पडणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पुर येऊन चंद्रपूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. याचा फटका शेतकऱ्यांसह सामान्यांनाही चांगलाच बसला व यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अशा पुर सदृश्य परिस्थितीत गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील साहिल वाघाडे याचा पूर परिस्थितीमुळे उपचारा अभावी दुर्दैवी अंत झाला. ही बाब राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या पूर परिस्थिती पाहणी दौरा दरम्यान शुक्रवारी लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता काळाच्या झडपेत निसंतान झालेल्या वाघाडे दांपत्यांची भेट घेऊन व्यथा जाणून घेत सांत्वन पर भेट देऊन आर्थिक मदत देत भूमिपुत्र असल्याचे कर्तव्य बजावले.