Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै ०२, २०२२

आगीत छत्र हरविलेल्या कुटंूबप्रमुखाला डॉ. अंकुश आगलावे कडून आर्थिक मदत




भद्रावती तालुक्यातील टाकळी या गावांत गोकुळ झिबला दानव यांचे घरी काल अचानक आग लागली. आगीचे कारण अद्यापही समजले नसून आग इतकी भयंकर होती की दानव यांचे घराचे संपूर्ण साहित्य आगीत भस्म झाले. यात टर्ी.वी. िफ्रज, व इतर मौल्यवान साहित्य जळून खाक झाले.
भद्रावती तालुक्यातील समाजसेवक व कोरोनायोध्दा डॉ. अंकुश आगलावे, गुरूदेव प्रचारक व केंद्रीय मानवाधिकार संगठनचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष यांना ही माहिती कळताच घटना स्थळी धाव घेतली व मा. तहसिलदार यांना फोनवरून सुचना देवून पटवारी मार्फत मोका चौकशी करून पंचनामा केला व त्यानंतर महावितरण कंपनीला सुचित करून चौकशी करावयास लावले. डॉ. आगलावे यांनी तात्काळ पाच हजार रूपयाची आर्थिक मदत दानव कुटंूबियांना दिली व शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळण्याकरीता पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. आगलावे यांनी सांगितले.
        दानव कुटूबियातील कर्ता पुरूष मोलमजुरी करून आपले उदरनिर्वाह करतात त्यातच कुटंूबियांची पालनपोषणाची व मुलाचे शिक्षणची जवाबदारी आहे. मोलमजुर करणाÚया दानव कुटंूबियांचे  छत्र हरविले असल्याने आर्थिक संकटात सापडलेला आहे.  
          यावेळी टाकळी गावांतील प्रभाकर मत्ते, निळकंठ दानव, शंकर खांडाळकर, बाबा बलकी, राजु आसेकार, राहुल बलकी, सचिन ढेंगळे, केशव देउळकर, विक्रम पेटकर, मोरेकांत लेडाजे, मारोती खाडे, करन मत्ते व गावातील ज्येष्ठ नागरिक, गुरूदेव प्रचारक, केंद्रीय मानवाधिकार संगठनचे पदाधिकारी  उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.