चंद्रपूर | (@cmcchandrapur) मनपाच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या नवीन २६ प्रभागांवर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह ५१ जणांनी प्रारूप प्रभागावर हरकती व आक्षेप नोंदविले होते. त्यावर नागपूर एमएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. आता २ जुलैला अंतिम प्रभाग जाहीर होणार आहे.
माजी उपमहापौर राहुल पावडे, माजी स्थायी समिती सभापती संदीप आवारी, संजय कंचर्लावार यांच्या प्रभागात बरेच बदल झाल्याने त्यांनी आक्षेप नोंदविला. याशिवाय काँग्रेसच्या ज्येष्ठ माजी नगरसेविका सुनीता लोढिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय वैद्य, शिवसेनेच्या आखरे यांनीही त्यांचे आक्षेप व हरकती मांडल्या. चंद्रपुरातील २५ प्रारूप प्रभागांवर नागरिकांचे आक्षेप नोंदवून सुनावणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने नागपूर एमएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांची नियुक्ती केली. त्यांच्यासमोर ५१ जणांच्या आक्षेप व हरकतींवर सुनावणी झाली. अंतिम आराखडा २ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध होईल. यावेळी रोहयो नागपूरच्या उपायुक्त राजलक्ष्मी शाह, चंद्रपूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपिन पालिवाल यांच्यासह अधिकारी व अभियंत्यांची उपस्थिती होती.
Gandhi Chowk Road, W7WW+FC8, Bazar Ward, Samadhi Ward, Bazar Ward, Chandrapur, Maharashtra 442402, भारत