Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे १९, २०२२

कवी दौलत खानेकर यांच्या "पुष्पगंध" काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा थाटात

शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
: वरोरा तालुक्यातील खांबाळा येथील रहिवासी कवी दौलत शामराव खांनेकर यांचे प्रतिभा विलासातून आकारास आलेला ''पुष्पगंध' काव्यसंग्रह दिनांक 16 मे 2022 ला सायंकाळी ६ वाजता येथील श्रावणी सेलिब्रेशन हॉल येथे थाटात प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनिल शिंदे माजी प्राचार्य महिला महाविद्यालय बल्लारपूर तथा अध्यक्ष संस्थाचालक महामंडळ नागपूर यांनी, यांनी भूषविले होते. विशेष अतिथी म्हणून डॉ. मंगेश गुलवाडे उपाध्यक्ष धनगर समाज आरक्षण समिती महाराष्ट्र राज्य तथा प्रसिद्ध नाक-कान-घसा तज्ञ चंद्रपुर,
डॉ .प्रभाकर लोंढे , प्राचार्य , शहीद जा. ति. जि. प. कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव जि. गोंदिया तथा कवी लेखक;
मा. वामनराव तुरके सिनेट सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, प्रसिद्ध वकील अँड. बक्क्ष सर हिंगणघाट,
मा. विठ्ठलराव तुरके सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया,
तसेच रसिक श्रोतेगण यांचे समक्ष ''पुष्पगंध'' काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न झाला .

सर्व पाहुण्यांनी नवोदित कवी श्री दौलत खानेकर यांचे 71 व्या वाढदिवसाच्या केक कापून शुभेच्छा
व अभिनंदन केले व ह्या काव्यसंग्रहाचे भवितव्य उज्वल ठरो अशा शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोलताना डॉ.गुलवाडे म्हणाले की आज दुधसर्करा योग आहे 71 व्या जन्मदिवस काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे यासाठी कवीचे करावे तेवढे कौतुक कमी आहे, लेखनाच्या माध्यमातून खरी समाज जागृती होत असते असे डॉ गुलवाडे यांनी सांगितले,

डॉ लोंढे सर यांनी बोलताना सांगितले की संग्रह प्रकाशित होण्यास फार उशीर झाला आहे हाच संग्रह 20-25 वर्षे आधी प्रकाशीत झाला असता तर आज दौलतराव खानेकर सर्वांचे मार्गदर्शक असते वामन तुरके यांनी सुद्धा शुभेच्छा देऊन सर्वांना अनमोल मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल शिंदे म्हणाले की, फक्त आई-वडिलांचे प्रेम हे निस्वार्थ असतात,कवी,लेखक निर्भीडपणे परिणामाची चिंता न करता लोकशाही, राजकारण व सामाजिक विषयावर परखड मत मांडतात याच्या धैर्याचे कौतूक आहे व याचा मला अभिमान वाटतो.

या प्रसंगी श्रीमान विठ्ठलराव तुरके यांनी काव्यसंग्रहाचे अंतरग उलगडून दाखविले.समाजातील भेडसावणाऱ्या वर्तमान समस्या, स्त्रियांच्या समस्या, राजकारण ,शेतकर्यांच्या समस्या,इत्यादी बर्याच विषयांना स्पर्श करून कवितांमध्ये सडेतोड परामर्श घेतल्याचे सांगितले. तसेच त्यांनी निवडक कवितांचे रसग्रहण केले. अध्यापिका मंजुशा ताराचंद खानेकर, अँड.उज्वला रमेशराव चिडे, अँड. अस्मिता अरविंदराव मुंगल यांनी श्रोत्यांना पुष्पगंध काव्यसंग्रहातील निवडक कविता वाचून दाखविल्या.

कवी दौलत खानेकर यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की, समाजातील लोप पावत चाललेली वाचन संस्कृती याबद्दल खेद व्यक्त केला.समाजातील लेखक,कवी यांनी नव नवीन कलाकृती समाजापुढे ठेवून त्यांना वाचते करावे.मोबाइलवरील वाचन म्हणजे चहा टपरीवर उभ्यानं समोसा, वडापाव खाण्यासारखे आहे.ज्यामुळे भूकही जात नाही आणि पोटही भरत नाही.,असे ते म्हणाले. ह्या काव्य संग्रहातील प्रत्येक कविता जणू एक एक सुगंधी फूल आहे.त्याचा सुगंध प्रत्येक कवितेतून दरवळतो आहे.म्हणून ह्या काव्य संग्रहाचे नांव पुष्पगंध असे ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले,.'पुष्पगंध' काव्यसंग्रहात एकूण 208 पाने असून सुंदर मूख पृष्ठ नांवाला साजेसे आहे.ह्या काव्य संग्रहात एकूण 130 कविता असून त्यात , कविता 95, भावगिते 19, भक्तिगीते 10,आणि बालगिते 5 व एक लोकगीत आहे.असा हा काव्य संग्रह घराघरांत वाचल्या जावा असे त्यांनी आवाहन केले.याप्रसंगी श्रीमाननीय बँक्स सर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून कवी आणि त्यांचा काव्य संग्रहाला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमांचे संचालन अरविंद मुंगल रा. हिंगणघाट यांनी रसाळ व ओजस्वी भाषेत केले. कार्यक्रमापूर्वी सरस्वती देवी, राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि दिवंगत पुष्पा दौलत खानेकर यांचे फोटोंचे पूजन व पूष्पहार अर्पण करून वंदन करण्यांत आले.पाहुण्यांनी दीप प्रज्वलन केले.श्री अंबर खानेकर यांनी प्रास्ताविक व प्रमुखपाहुणे यांचा परियच करून दिला तर अँड. समिक्षा महेश माहुरे रा. नाशिक यांनी आभार प्रदर्शन केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.