Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे ०६, २०२२

परसोडा येथे रोजगार हमी योजना अंतर्गत नाविन्यपूर्ण समुदाय विकासासाठी वैरण लागवड उपक्रमाचा शुभारंभ




जिल्ह्यातील परसोडा येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नाविन्यपूर्ण समुदाय विकासासाठी वैरण लागवड उपक्रमाचा शुभारंभ आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते पार पडला.

आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, महिलांच्या सर्वागीण विकास होण्याकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम आणण्यासाठी हा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात शेतीसोबत पूरक व्यवसाय येथील महिलांना मिळण्यासाठी समुदाय विकासासाठी वैरण लागवड हा नाविन्यपूर्ण प्रयोग सुरु करण्यात आला. या माध्यमातून या विधानसभेतील महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. येत्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी महिलांना मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याची सांगितले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.





याप्रसंगी जिल्हा परिषद चंद्रपूर उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, गटविकास अधिकारी राजेश राठोड, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय वानखेडे, पशुधन अधिकारी डॉ. नेव्हारे, पशुधन विकास अधिकारी डॉ. आगरते, मिलिंद भोयर, संदीप दाडमल, राजू चिकटे, तसेच उमेद सेलचे अधिकारी, पंचायत समिती वरोरा येथील अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.