आज दिनांक 20 एप्रिल 2022 ला पठाणपुरा रोड जैन भवन समोरील जि.प.सिटी प्राथ शाळा चंद्रपूर येथे शाळापूर्व तयारी चें आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम दाखलपात्र विद्यार्थी व पालकांना आमंत्रित करण्यात आले.
शाळापूर्व तयारी मेळाव्या करीता प्रभातफेरी व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कु.वैशाली सूर्यवंशी यांनी करून पालकाना कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
कार्यक्रमाचे उदघाटन शाळा व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षा सौ.पद्माताई चामरे यांनी केले.
*दाखल पात्र विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे पुष्पगुच्छ फुगे चॉकलेट देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
*नोंदणी स्टॉल वर नाव नोंदणी करून त्यांचे वजन मोजण्यात आले व पाचही स्टॉल वर त्यांची क्षमता तपासण्यात आली व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
शासनाने पुरविलेल्या उपक्रम पुस्तिका नवोदित विद्यार्थ्यांना देण्यात आली.
स्वयंसेवक व सहभागी पालकांना अध्यक्ष यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. अशाप्रकारे शाळापूर्व तयारीचा एप्रिलमध्ये पहिला टप्पा पार पडला.
याच कार्यक्रमाचा दुसरा टप्पा 27 जून ला शाळेच्या पहिल्या दिवशी राहील. नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत व शाळापूर्व तयारी आयोजन ह्यामध्ये पाच प्रकारचे स्टॉल राहणार आहेत. बौद्धिक विकास ,समाजीक व भावनिक विकास, शारीरिक विकास, नोंदणी कक्ष, भाषा विकास, गणनपूर्व तयारी इ. यामध्ये विद्यार्थ्यांची क्षमता तपासली जाईल. लाकडाऊन नंतर शासनाने विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य मुलांना पुरविलेल्या आहेत. त्या साहित्याचे वितरण या दुसऱ्या टप्प्यामध्ये केले जाणार आहे.
Z.P. Pre-school preparation meet at City Primary School