चंद्रपूर जिल्ह्यातील उपग्रहाचे अवशेष तपासणीसाठी इस्त्रोची टीम येणार; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
चंद्रपूर ”जिल्ह्यात चार ठिकाणी उपग्रहाचे अवशेष मिळाल्यानंतर इस्त्रो व डीआरडीओ सोबत संपर्क साधण्यात आलेला आहे. त्यांना लोखंडी रिंग, चेंडूच्या आकाराचे सिलेंडर व घटनास्थळाची छायाचित्रे पाठविली आहे. इस्त्रोला सविस्तर मेल पाठविल्यानंतर त्यांनी या संपूर्ण बाबीची माहिती घेण्यासाठी एक टीम येणार आहे. मात्र, ही टीम नेमकी कधी येणार याबाबत मात्र कळविले नाही.” अशी माहिती चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज 4 एप्रिल रोजी दिली आहे.
”चंद्रपूर जिल्ह्यात चार ठिकाणी अवशेष मिळाल्यानंतर अमेरिकेतील भौतिकी विभागाचे तज्ञ जॉनाथन मॅक्डोवेल यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांना ईमेलवर या भागात मिळालेल्या अवशेषाची सर्व छायाचित्र आणि माहिती पाठवली. त्यानंतर त्यांनी स्वत: संपर्क करून व मेलच्या माध्यमातून या बाबीची खात्रीलायक माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सर्व छायाचित्रे तपासून बिघतली, ही सर्व छायाचित्रे त्यांनी सातत्याने तपासून बघितल्यानंतर चीनच्या उपग्रहाचे अवशेष असल्याचे सांगितले आहे. हे अवशेष न्यूझीलंड येथील नाहीत.” अशी माहिती चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक सचिन वझलवार यांनी दिली आहे.
An Istro team will visit Chandrapur district to inspect the remnants of the satellite