भारतीय कम्युनिस्ट पक्षाने व प्रवाशांनी रेल्वे खात्याचे केले स्वागत.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.6 एप्रिल:-
कोरोनाच्या काळात ठप्प झालेली रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी हळुवार गतीने प्रयत्न सुरू झाले आहेत. 5 एप्रिल रोजी गोंदिया बल्लारशा रेल्वे गाडी सायंकाळी पाच वाजता गोंदिया जंक्शन वरून धावली. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठाच दिलासा मिळाला. प्रवाशानी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. गोंदिया- वडसा -चंद्रपूर -बल्लारशा मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक यांनी 15 सप्टेंबरला सौंदड रेल्वे स्टेशनवर तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत रेल्वेने 28 सप्टेंबर पासून गोंदिया बल्लारशहा रेल्वे गाडी सुरू केली होती. परंतु या मार्गावर परतीची गाडी नसल्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत होते. त्यामुळे पुन्हा दिनांक 21 फेब्रुवारीला भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटकच्या वतीने वडसा जंक्शन येथे तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत, रेल्वे प्रशासनाने 5 एप्रिल रोज मंगळवारपासून गोंदिया येथून सायंकाळी पाच वाजता सुटणारी रेल्वे गाडी अखेर सुरू झाली.भाकपच्या वतीने भाकप व आयटकच्या वतीने पायलट व गार्ड यांचे रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले. रेल्वे गाडी सुरू झाल्याने कॉम्रेड मिलिंद गणवीर, रामचंद्र पाटील, करुणा गणवीर, प्रल्हाद उईके, परेश दुरुगवार, इस्त्राईल शेख, प्रकाश चवरे, साजिद कुरेशी,आयटकचे विनोद सहारे, महेंद्र कटरे, माणिक उके, महेंद्र भोयर, गुलाबचंद लिचडे, सुनील लिल्हारे,प्रमोद काटेकर, राजेश देवगडे, यशवंत दमाहे, श्याम कटरे यांनी रेल्वे विभागाचे स्वागत केले. प्रवाशांच्या सेवा पूर्ववत सुरू कराव्यात,गोंदिया येथील ओव्हर ब्रिज प्रवाशांसाठी लवकर सुरु करावे. आदी मागण्या यावेळी कॉम्रेड मिलिंद गणवीर यांनी केले. आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने मेमू पॅसेंजर स्पेशल ट्रेन ५ एप्रिलपासून चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गाडी क्रमांक ०८८०४/०८८०३ गोंदिया - बल्लारशाह जंक्शन - गोंदिया मेमू पॅसेंजर स्पेशल गोंदिया येथून ०५ एप्रिल आणि बल्हारशाह जंक्शन ०६ एप्रिल २०२२ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत धावत आहे. प्रवाशांना प्रवास करताना केंद्र व राज्य शासनाचे कोरणा विषयक नियम पालन करावे लागेल.या मार्गावरील प्रवाशांची बऱ्याच दिवसापासून मागणी होती, ती आज पूर्ण झाली आहे. या निर्णयाने सर्व नागरिकांना आनंद व्यक्त केला आहे. रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे, प्रवाशांना कमालीचा मानसिक शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला होता. रेल्वे खात्याच्या या निर्णयाचे या मार्गावरील प्रवाशांनी स्वागत करून रेल्वे विभागाचे आभार मानले आहे.