Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल २९, २०२२

भाजप सत्ताधाऱ्यांनी घेतला महानगरपालिकेचा निरोप |



भाजप सत्ताधाऱ्यांनी घेतला महानगरपालिकेचा निरोप |

महानगरपालिकेतील पंचवार्षिक कार्यकाळ संपला निमित्त आज 29 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधाऱ्यांनी सफाई कामगार अशा वर्कर आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करीत महापालिकेचा निरोप घेतला. 


महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर झालेल्या छोटेखानी  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राखी संजय, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगराध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे यांच्यासह भारतीय जनता पार्टी च्या सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती. 



यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महानगरपालिकेत स्वच्छतेसाठी सेवा देणाऱ्या सफाई कामगार आरोग्यासाठी सेवा देणाऱ्या आशा वर्कर आणि हानगरपालिकेतून सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचार्‍यांच्या देखील भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. 


आज भाजपप्रणित चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवसा आहे.

त्यानिमित्तानं, चंशमपात भारतीय जनता पार्टीला शहराच्या सेवेची संधी दिल्याबद्दल शहरवासीयांचे आभार मानण्याच्या उद्देशाने पदाधिकारी व नगरसेविकांच्या वतीने छोटेखानी समारोपीय कार्यक्रम तथा कोविड काळापासून आजतागायत सेवा देणार्‍या योद्ध्यांचा सत्कार कार्यक्रम स्थानिक गांधी चौकात आयोजित करण्यात आला. 



यानिमित्तानं, मनपाच्या माध्यमातून जनसेवेसारख्या ईश्वरीय कार्यात असलेल्या आशा वर्कर्स भगीनी व सफाई कामगार बांधवाचा सत्कार केला.

यासोबतच, सर्व नगरसेवकांना गुलाबपुष्प देऊन आणि मनपाची सेवासमाप्ती झालेले कर्मचारी श्री. दिलीप नवघरे व श्री. राजेश झाडे यांचा सत्कार करून सर्वांना निरोप दिला.


लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वात गेल्या पाच वर्षात चंद्रपूर शहराचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी मोठे विकासकार्य भाजपप्रणित चंशमपाने केली.



गेल्या कित्येक वर्षांपासून आधी नगरपरिषद आणि आता मनपा असा कालावधी होता, यामध्येही आम्हाला जनसेवेची जेमतेम सात वर्षे मिळाली आणि या कालावधीमध्ये सुद्धा न भुतो असा विकास व उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम चंद्रपूरकरांसाठी आम्ही केला आहे. आदरणीय सुधीरभाऊंनी या शहराच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही. मनपाच्या पदाधिकाऱ्यांपासून ते सर्व नगरसेवक/सेविका सर्वांनी जनतेच्या सेवेसाठी पाच वर्षे भरीव योगदान दिले. आज जरी या कार्यकाळाचा शेवटचा दिवस असला तरी चंद्रपूरकरांच्या प्रेम व आशीर्वादाने आमचे सर्व नगरसेवक/सेविका पुन्हा जनतेच्या सेवेस हजर होतील. असा विश्वास याठिकाणी बोलताना व्यक्त केला.


यावेळी, महानगराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, मावळत्या महापौर सौ. राखीताई कंचर्लावार, जिल्हा उपाध्यक्ष रामपाल सिंह, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, गटनेत्या सौ. जयश्रीताई जुमडे, सभागृह नेते देवानंद वाढई, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, विठ्ठलराव डुकरे, राजेंद्र खांडेकर, नगरसेवक सुभाष कासगोट्टूवार, प्रदिप किरमे, रवी आसवाणी, अड. राहुल घोटेकर, बंटी चौधरी, सौ. सविताताई कांबळे, सौ. शिलाताई चव्हाण, सौ. चंद्रकलाताई सोयाम, सौ. शितलताई गुरनूले, सौ. पुष्पाताई उराडे, सौ. संगीताताई खांडेकर, सौ. वनिताताई डुकरे, सौ. कल्पनाताई बगुलकर, सौ. मायाताई उईके, सौ. वंदनाताई जांभुळकर, सौ. ज्योतीताई गेडाम यांचेसह भाजपचे नगरसेवक नगरसेविका व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नगरसेविका सविता कांबळे यांनी केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.