महिला विश्वचषक: भारत-पाक सामना रंगण्याआधी कोहलीने 'कू'वर 'विमेन इन ब्लू'ना केलं 'चीयर्स'!
राष्ट्रीय, 2 मार्च, 2022: भारताचा लोकप्रिय क्रिकेटस्टार आणि माजी कॅप्टन विराट कोहलीने बुधवारी सगळ्यांना एक खास आवाहन केले. हे आवाहन होते, होऊ घातलेल्या आगामी महिला एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान मॅचच्या आधी 'वुमन इन ब्लू'साठी चीयर करण्याचे.
महिला एकदिवसीय विश्वचषक शुक्रवारपासून सुरू होतो आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये अतिशय अटीतटीचा सामना होणार असून चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे.
मोहाली इथे 100 वी टेस्ट मॅच खेळायला तयार असलेल्या कोहलीने ने भारतीय महिला क्रिकेटर्सना बळ देत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी एक अनोखा व्हीडिओ 'कू' वर पोस्ट केला आहे. 40 सेकंदाच्या या व्हीडिओत महिला क्रिकेटर्सच्या कामगिरीची झलक पहायला मिळते.
"#WomenInBlue ला चीयर करणं आणि यातून #HamaraBlueBandhan ची ताकत दाखवण्यासाठी याहून योग्य वेळ नाही, कारण हा आईसीसी महिला विश्वचषक 2022 ची वेळ आहे!
यासाठी 6 मार्च, 2022 ला सकाळी 6.30 वाजतासाठी आपले अलार्म सेट करा, "कोहलीने 'कू' वर लिहिले.
मागच्या काही वर्षांमध्ये भारतात महिला क्रिकेट वेगात लोकप्रिय होताना दिसते आहे. स्मृति मंधाना, मिताली राज आणि झूलन गोस्वामी अशा महिला क्रिकेटर्सची नावे भारतीय क्रिकेटरसिकांच्या ओठांवर रुळली आहेत. --------------------------