गुढीपाडवा हा मराठी लोकांचा नवीन वर्ष मानला जातो. या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून येत्या २ एप्रिलला उत्कृष्ठ महिला मंचातर्फे पाडवा संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शुभ मुहूर्तावर खास चंद्रपूर वासियांना मराठी नवीन वर्षांच्या शुभेच्छा देत हा कार्यक्रम होऊ घातला आहे. या प्रसंगी संपूर्ण भारतभर गायनाचे कार्यक्रम करणारे तसेच विदर्भातील युवा गायक, पं. मुरली मनोहर शुक्ल गुरुजी, (मुंबई) यांचे शिष्य श्री. प्रणय रमेशराव गोमाशे हे पाडवा संध्या या कार्यक्रमात त्यांच्या चमू सह खुद्द गायन करणार आहेत. हा कार्यक्रम मागील काही वर्ष सुद्धा पार पडला होता परंतू कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळया कार्यक्रमांवर स्थगिती आली होती. परंतु आता मात्र चंद्रपूरच्या संगीत रसिकांना या मैफिलीचा आनंद लुटता येणार आहे. हा पाडवा संध्या कार्यक्रम येत्या २ एप्रिलला सायंकाळी ठिक ५:३० वाजता पवनसुत दवाबाजार जवळ, पंचतेली समाज हनुमान मंदिर समोर जटपुरा वॉर्ड, चंद्रपूर येथे पार पडणार आहे. आयोजित ह्या कार्यक्रमात रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे, चंद्रपूर मनपा सभापती झोन क्र.1 तथा उत्कृष्ट महिला मंच च्या अध्यक्ष सौ. छबुताई वैरागडे ह्यांनी चंद्रपूर वासियांना आव्हाहन केले आहे.
Organizing Padva Sandhya program in Chandrapur city