Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च १७, २०२२

जुन्नरमध्ये लतादीदिंना त्यांच्या लोकप्रिय गीतांनी स्वरांजली




जुन्नरमध्ये लतादीदिंना त्यांच्या लोकप्रिय गीतांनी स्वरांजली

जुन्नर /आनंद कांबळे
भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या जुन्नरच्या कलोपासक या संस्थेने त्यांच्या लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम आयोजित केला. पुणे येथील संदीप पंचवटकर व सहकाऱ्यांनी लतादीदींच्या आठवणींना ' लतायुग ' या कार्यक्रमाच्या माध्यमातून उजाळा दिला. उपस्थित संगीत रसीक स्वरांच्या वर्षावात न्हाऊन गेले. अशी माहिती स्वागताध्यक्ष विनायक कर्पे व संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सावंत यांनी दिली.    कलोपासकच्या मावळत्या अध्यक्षा वैशाली सावंत यांनी निवनियुक्त अध्यक्षा मनीषा कोरे यांच्याकडे  पदभार दिला.          उद्योजक रमेश जुन्नरकर, पु. ना. गाडगीळ समूहाचे सतीश कुबेर,  डॉ. संदीप डोळे, पुणे मध्यवर्ती बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाष कवडे, कलो पासक संस्थेचे  कार्याध्यक्ष सुरेश भोसले,  सचिव शरद रेळेकर,  संचालक प्रमिला जुन्नरकर ,  चंद्रशेखर गाजरे ,  वैभव मलठणकर , धनराज खोत,  विश्राम आकडमल, धर्मेंद्र कोरे,नितीन ससाणे , रमेश ढोमसे , स्वाती भागवत आदी  मान्यवर उपस्थित होते.


In Junnar, Latadidin was enchanted by his popular songs


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.