Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च २३, २०२२

नवेगावबांध येथे जलदिना निमित्त जलसाक्षरता मोहीम व प्रगतशील शेतकरी कार्यशाळा.

जल जागृती सप्ताहाचा नवेगावबांध येथे जिल्हास्तरीय समापन


संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२३ मार्च:-
राज्यस्तरीय जलजागृती सप्ताह १६ मार्च ते २२ मार्च दरम्यान राबविण्यात आला. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यात जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आले होते.
या सप्ताहाचे जागतिक जलदिना निमित्त जलसाक्षरता मोहीम व प्रगतशील शेतकरी कार्यशाळा कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती नवेगाव बांध येथील सभागृहात संपन्न होऊन, जिल्हास्तरीय जलजागृती सप्ताहाचे समापन झाले.नवेगावबांध येथील जलाशयाच्या जेटी पॉइंटवर १६ मार्च रोजी या सप्ताहानिमित्त जल पूजन करून, या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला होता. या सप्ताहात जिल्हास्तरीय सांगता नवेगावबांध येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात आली. जागतिक जलदिनानिमित्त दिनांक २२ मार्च रोज गुरुवारला जलसाक्षरता मोहीम व प्रगतशील शेतकरी कार्यशाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंचन मंडळाचे अध्यक्ष रा.ग. पराते हे होते. तर मुख्य अतिथी सोनाली सोनुले, कार्यकारी अभियंता गोंदिया पाटबंधारे विभाग गोंदिया, तर पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर, नवेगाव बांध क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे . लोकपाल गहाणे प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी-मोर, डॉ.अविनाश काशीवार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सडक-अर्जुनी, जलमित्र सतीश कोसरकर, नवेगावबांध प्रगतशील शेतकरी रतिराम राणे, नंदेश्वर, देवाजी सोनवणे, दिलीप कापगते, अण्णा डोंगरवार, पाणी वापर सहकारी संस्थेचे महादेव बोरकर, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, विजयाताई कापगते, रामदास बोरकर,जितेंद्र कापगते, नामदेव डोंगरवार प्रामुख्याने उपस्थित होते. जलसाक्षरता व प्रगतीशील शेतकरी यावर जलमित्र सतीश कोसरकर यांनी जल विषयी प्रमुख मार्गदर्शन केले. तर प्रगतशील शेतकरी नंदेश्वर,सोनवाने धाबे टेकडी, आदर्श रतिराम राणे गोठणगाव, दिलीप कापगते कोसमतोंडी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तर पाणी वापर संस्थेविषयी अण्णा डोंगरवार, महादेव बोरकर यांनी पाण्याची काटकसर, सिंचनात पाण्याचे महत्व यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला रचना ताई गहाणे जि प सदस्य लायक राम भेंडारकर जि प सदस्य मुख्य प्रशासक लोकपाल गाणे यांनीही मार्गदर्शन केले. तर अध्यक्षपदावरून सिंचन मंडळाचे अध्यक्ष पराते यांनी मार्गदर्शन केले. सोनाली सोनुले कार्यकारी अभियंता गोंदिया पाटबंधारे विभाग गोंदिया यांनी जलसाक्षर ते वर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाणे, कनिष्ठ अभियंता जलसंपदा विभाग अर्जुनी-मोर तर उपस्थितांचे आभार समीर एस. बनसोड उपविभागीय अभियंता जलसंपदा विभाग नवेगावबांध यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य पाणी वापर संस्थेचे सदस्य व शेतकरी बांधव, प्रगतशील शेतकरी,प्रगत शेतकरी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.