पंतप्रधान साधणार विद्यार्थी पलक शिक्षकांशी संवा
संजीव बडोले प्रतिनिधी
नवेगावबांध दि.३० मार्च:-
प्रसार माध्यमाचे गोंदिया जिल्ह्याचे नोडल अधिकारी एम. एस. बलवीर प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध जिल्हा गोंदिया यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे. पंतप्रधान मोदींच्या विद्यार्थ्यांसोबतच्या या संवादाची ५ वी आवृत्ती १ एप्रिल शुक्रवार ला सकाळी अकरा वाजता तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे होणार आहे.यावेळी पंतप्रधान मोदी आणि विद्यार्थ्यांमधील हा महत्त्वाचा संवाद आयोजित करण्यात आला आहे. या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना मनोबल उंच ठेवण्याची प्रेरणा देतील. यासोबतच परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजनाही पंतप्रधान विद्यार्थ्यांना सुचवणार आहेत.परीक्षेवरील चर्चेची प्रतीक्षा आता संपली आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि परीक्षेच्या तणावावर मात कशी करता येईल याविषयीची माहिती सांगणार आहेत. तरीपण गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे, आवाहन जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांधचे प्राचार्य तथा या कार्यक्रमाच्या प्रसार माध्यमाचे नोडल अधिकारी एम. एस. बलवीर यांनी केले आहे. तसेच या कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक यांचे समवेत आभासी माध्यमाद्वारे एक एप्रिल रोजी शुक्रवार ला सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन करून शाळांनी सहभागी व्हावे. असे आवाहन शिक्षण विभागा च्या वतीनेही करण्यात आले आहे.