६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत चंद्रपूर केंद्रातून नवोदिता , चंदपूर या संस्थेच्या डार्क फँटसी या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे . या नाटकाची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे चंद्रपूर केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे कल्याण बहुउददेशीय संस्था , यवतमाळ या संस्थेच्या प्रियंका आणि दोन चोर या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच , चंद्रपूर या संस्थेच्या रुपक या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे .
दिग्दर्शन प्रथम पारितोषिक प्रशांत कक्कड ( नाटक- डार्क फँटसी ) , द्वितीय पारितोषिक अशोक आष्टीकर ( नाटक - प्रियंका आणि दोन चोर ) , प्रकाश योजना प्रथम पारितोषिक मिथून मित्रा ( नाटक- डार्क फँटसी ) , द्वितीय पारितोषिक हेमंत गुहे ( नाटक - रुपक ) , नेपथ्य प्रथम पारितोषिक मुन्ना गहरवाल ( नाटक - प्रियंका आणि दोन चोर ) , द्वितीय पारितोषिक तेजराम चिकटवार ( नाटक - रुपक ) , रंगभूषा : प्रथम पारितोषिक मेघना शिंगरु ( नाटक- रुपक ) , द्वितीय पारितोषिक मंजुषा खर्चे ( नाटक - प्रियंका आणि दोन चोर ) , उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक गौरव भट्टी ( नाटक - डार्क फँटसी ) व स्नेहल राऊत ( नाटक- डार्क फँटसी ) , अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे बकुळ धवने ( नाटक - रुपक ) , कल्याणी भट्टी ( नाटक- डार्क फँटसी ) , ऐश्वर्या देशमुख ( नाटक - प्रियंका आणि दोन चोर ) , राधा सोनटक्के ( नाटक - क्षण एक पुरे ) , अमित राऊत ( नाटक - प्रियंका आणि दोन चोर ) , ऋषीकेश व्यास ( नाटक- आई रिटायर होतेय ) , अशोक सोनटक्के ( नाटक- क्षण एक पुरे ) , समीर रामटेके ( नाटक - अंधारडोह ) . दि . २३ फेब्रुवारी ते २ मार्च २०२२ या कालावधीत प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह , चंद्रपूर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण ८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले .
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सर्वश्री अरुण भडसावळे , दिलीप देवरणकर आणि विश्वनाथ निळे यांनी काम पाहिले . सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री . बिभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे .
60th Maharashtra State Amateur Marathi Drama Competition Dark Fantasy First from Chandrapur Center