Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी ०८, २०२२

त्यागमूर्ती माता रमाई यांची १२४ वी जयंती साजरी


त्यागमूर्ती माता रमाई यांची १२४ वी जयंती साजरी



मूल: येथील लुम्बिनी महिला मंडळ आणि रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वार्ड क्र.१६ येथे दिनांक ७ February  २०२२ ला दुपारी ३.०० वाजता *त्यागमूर्ती माता रमाई* यांची १२४ वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षा आयु. भावना किशोर लाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून आयु. सिंधूताई गोवर्धन, काजल दुधे सामाजिक कार्यकर्त्या या होत्या.

 आयु. प्रिया गेडाम, आयु. रोहिणी बनकर, आयु. सिंधूताई गोवर्धन यांनी रमाई  गीत प्रस्तुत केले. कार्यक्रमात वॉर्डातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. शिल्पा देवेंद्र बांबोळे  व उपस्थित पाहुण्यांचे आभार आयु. सुनीता देवगडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयु. माया पुणेकर, स्वीटी रामटेके , मायाताई झाडे , ललिताबाई मेश्राम,बागडे मॅडम,भाग्यश्री तागडे,पल्लवी समर्थ, माधवी तेलसे,सीमा भसारकर, नीता रामटेके, वर्षा रामटेके, इंदूताई रामटेके यांनी अथक परिश्रम घेतले.

Mata Ramai's 124th Jayanti celebrated

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.