Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी १५, २०२२

कोळसा खाणीतील खड्ड्यात पडून बिबट्याचा मृत्यू

चंद्रपूर शहराजवळील दुर्गापूर येथे वेकोलीच्या कोळसा खाणीतील सेक्टर दोन मध्ये असलेल्या खड्ड्यातील पाण्यामध्ये पडून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना 15 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे.



मागील काही दिवसांपासून कोळसा खाणीच्या परिसरामध्ये बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे उघडकीस आले होते. यातच दुर्गापूर वेकोलिच्या कोळसा खाणीतील सेक्टर 2 मध्ये असलेल्या खड्ड्यात पाणी आहे. हे पाणी बाहेर काढण्यासाठी येथे मोटारपंप देखील लावण्यात आले आहे. आज पहाटेच्या सुमारास अंधारात आलेल्या बिबट्याचा या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. ही घटना लक्षात येताच वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली. वन अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृत बिबट्याला बाहेर काढले. त्यानंतर transit treatment centre येथे डॉक्टर कुंदन कोडसेलकर यांनी बिबट्या वर शवविच्छेदन केले. यावेळी वन विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक श्री चौरे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, इको प्रो अध्यक्ष बंडू धोत्रे, मुकेश भांदककर यांची उपस्थिती होती.







Leopard dies after escaping from coal mine


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.