जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतला चंद्रपूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचा आढावा
चंद्रपूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत आज 9 फेब्रुवारी रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री मा. विजय वड्डेटिवार यांच्या उपस्थितीत आढावा घेतला.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित जलसंपदा विभागाच्या प्रकल्पासंदर्भात
मंत्रालय येथे बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला.
या बैठकीस लघु पाटबंधारेचे उपसचिव अमोल फुंदे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर. डी. मोहिते, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री. देवगडे उपस्थित होते.
Vijay Wadettiwar