Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी ०९, २०२२

सेंट मायकेल शाळेच्या मैदानावर 16 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

आज पासून 'चंद्रपूर प्रीमियर लीग' स्पर्धेची सुरूवात #cpl





चंद्रपूर प्रीमियर लीग  CPL टी 20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा शहरातील लाईफ फाउंडेशन च्या वतीने आयोजित केली जाते. यंदा स्पर्धेचे आठवे पर्व आहे. स्थानिक रामनगरच्या सेंट मायकेल शाळा मैदानावर या स्पर्धेसाठी 4 महिने परिश्रम करून हिरवेगार मैदान खास तयार केले गेले आहे. सुमारे 2 महिन्यांपूर्वी या स्पर्धेसाठी 350 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. यानंतर रीतसर लिलाव प्रक्रियेद्वारे प्रत्येकी 15 खेळाडूंचा समावेश असलेल्या 16 चमुंचे गठन केले गेले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील अनुभवी आणि नवोदित क्रिकेटपटूना या स्पर्धेद्वारे नैपुण्य दाखविण्याची संधी दिली जाते. गुरुवारी सकाळी 9.30 वाजता या क्रिकेट कार्निव्हलचा उत्साही प्रारंभ होत आहे. उदघाटन सोहळ्याला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उद्योजक मनीष चड्डा, सेंट मायकेल शाळेचे प्राचार्य विकास कोल्हेकर यांची उपस्थिती राहणार आहे. गेली काही वर्षे अत्यंत व्यावसायिक पद्धतीने सिपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात असून यासाठी मान्यताप्राप्त दर्जाचे पंच, आणि इतर आवश्यक बाबीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. पहिला सामना  'चंद्रपूर पोलीस विरुद्ध डायनॅमिक फायटर्स'  यांच्यात खेळला जाणार आहे. यानंतर दररोज 2 लीग सामने खेळविले जाणार आहेत. विजेत्या संघाला १ लाख ११ हजार १११ रु. व लखलखती ट्रॉफी दिली जाणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार 27 फेब्रुवारी रोजी खेळविला जाणार आहे. स्पर्धेच्या यशासाठी लाईफ फाउंडेशन चे अध्यक्ष संजय तुमराम, उपाध्यक्ष आरीफ खान, नाहीद सिद्दीकी ,सचिव सुनील रेड्डी, कोषाध्यक्ष बॉबी दीक्षित, सदस्य शैलेंद्र भोयर, डॉ. किशोर भट्टाचार्य, रईस काजी, आर्किटेक्ट वसीम शेख, कमल जोरा, प्रकाश सुर्वे, जितेंद्र मशारकर, आशीष अम्बाडे कार्यरत आहेत. 




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.