चंद्रपूर प्रीमियर लीग' स्पर्धेचे पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांच्या हस्ते उद्घाटन
स्थानिक रामनगरच्या सेंट मायकेल शाळा मैदानावर चंद्रपूर प्रीमियर लीग CPL टी 20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांच्या हस्ते १० फेब्रुवारी रोजी पार पडले. यावेळी उदघाटन सोहळ्याला अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उद्योजक मनीष चड्डा, सेंट मायकेल शाळेचे प्राचार्य विकास कोल्हेकर यांची उपस्थिती होती. लाईफ फाउंडेशन चे अध्यक्ष संजय तुमराम, उपाध्यक्ष आरीफ खान, नाहीद सिद्दीकी यांनी पाहुण्याचे स्वागत केले.
लाईफ फाउंडेशन च्या वतीने हि स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. 2 महिन्यांपूर्वी या स्पर्धेसाठी 350 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. यानंतर रीतसर लिलाव प्रक्रियेद्वारे प्रत्येकी 15 खेळाडूंचा समावेश असलेल्या 16 चमुंचे गठन केले गेले होते. उद्घाटन सोहळ्यानंतर पहिला सामना 'चंद्रपूर पोलीस विरुद्ध डायनॅमिक फायटर्स' यांच्यात खेळला जाणार आहे. विजेत्या संघाला १ लाख ११ हजार १११ रु. व लखलखती ट्रॉफी दिली जाणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार 27 फेब्रुवारी रोजी खेळविला जाणार आहे.