Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी २६, २०२२

तालुक्यात मक्यावर प्रक्रिया उद्योग उभारणे काळाची गरज. -किशोर तरोणे.








संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.२६ फेब्रुवारी:-
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ग्लोबल फार्मर प्रोड्युसर कंपनी च्या माध्यमाने मक्या सारख्या पिकावर प्रक्रिया उद्योग उभारावा आणि याकरिता भरपूर प्रमाणात वाव तालुक्यांमध्ये दिसून येत आहे.तालुक्यात मक्यावर प्रक्रिया उद्योग उभारणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी केले.
ते अर्जुनी-मोर ग्लोबल फार्मर प्रोड्यूसर कंपनी ची सभा तालुक्यातील गोठणगाव येथे कंपनीचे संचालक पतीरामजी राणे यांच्या निवासस्थानी आज(दि.२६) पार पडली. यावेळी ते बोलत होते.सदर सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कंपनीचे कार्यकारी अधिकारी अमोल हटवार व अध्यक्षस्थानी कंपनीचे संचालक पतीरामजी राणे उपस्थित होते. सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, गोठणगावगाव जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य यशवंत गणवीर, गोठणगाव पंचायत समिती सदस्य आम्रपाली डोंगरवार ,माजी जिल्हा परिषद सदस्य रतिराम राणे उपस्थित होते.
नाबार्ड बँक व सारडा एनजीओ यांच्या मार्गदर्शनात ग्लोबल शेतकरी उत्पादक कंपनी च्या माध्यमाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भागभांडवल जमा करून प्रकल्प मार्गी लावावे, शेतकऱ्यांना उत्पादित मक्याला भाव मिळवून देण्याकरिता प्रयत्नशील असावे. ही किमया अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकरी करू शकतात.त्या करिता सर्वांनी प्रयत्नशील असावे.असे पुढे किशोर तरोणे यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले. सभेचे संचालन अमोल हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक राणे यांनी केले. सभेला उपस्थित सर्व मान्यवरांनी शेतकऱ्यांना संघटित होऊन शेती करण्याकरिता व कंपनीच्या माध्यमाने एकत्रित येण्याकरिता मार्गदर्शन केले. सदर सभेला शेतकरी म्हणून नरेंद्र कोडापे, उमराव कराडे ,रवींद्र घरत , संजय ईश्वर ,मनोहर धानोरकर, राकेश चांदेवार,विनोद किरसान ,राजकुमार तुलावी ,दिपक राणे, प्रेमलाल किरसान, युवराज तुलावी ,सदाराम औरसे ,नंदलाल राणे ,खलील सय्यद, पितांबर वाघमारे ,विनोद नाईक, दिपेश्वर टेंभुर्णे, सितेस ईश्वर, प्रल्हाद मेंढे, अलिम शेख उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.