सभागृहात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उमेदवार पाठवा.
माजी आमदार डायगव्हाणे यांचे आवाहन... अमृतमहोत्सवी जिल्हास्तरीय वार्षिक अधिवेशन
चंद्रपूर : विद्यार्थी ,शिक्षक-पालक ,शैक्षणिक संस्था, सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी सभागृहात लढवय्या नेतृत्वाची गरज आहे. मागील दहा वर्षात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर व शैक्षणिक धोरणावर बोलणारा शिक्षकांचा प्रतिनिधी सभागृहात नसल्याची खंत आहे. येणाऱ्या निवडणुकीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना सभागृहात भरघोस मताने निवडून पाठवण्याचे आवाहन माजी शिक्षक आमदार विश्वनाथ डायगव्हाणे याने चंद्रपूर येथे केले. उपस्थितांनी यावेळी टाळ्यांच्या कडकडात सभागृह दणाणून सोडले.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमृतमहोत्सवी जिल्हास्तरीय वार्षिक अधिवेशन आज दि. 27 फेब्रुवारी 2022 ला जिजाऊ सभागृह, दाताळा रोड, चंद्रपूर येथे संपन्न झाले. यावेळी उद्घाटक म्हणून माजी आमदार डायगव्हाणे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांतीय अध्यक्ष श्री श्रावणजी बरडे होते. सत्कारमूर्ती माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे, सौ पुष्पा डायगव्हाणे,
प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर चाफले, विजुक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजेंद्र खाडे, म.रा. माध्य. शिक्षक महामंडळाचे सहकार्यवाह जगदीष जुनघरी, प्रांतीय उपाध्यक्ष रमेष काकडे, श्रीधर खेडीकर, जयप्रकाश धोटे, कोशाध्यक्ष अविनाश बढे, माजी जिल्हाध्यक्ष गजानन गावंडे, जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे,नागपूर विभागातील सर्व जिल्हा अध्यक्ष, जिल्हा कार्यवाह विचार पिठावर होतो.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक माजी आमदार श्री व्ही. यु. डायगव्हाने यांच्या वयाला 75 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने माजी आमदार श्री व्ही. यु. डायगव्हाने यांचा सपत्नीक अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात आला.तसेच डोनेट कार्ड या संस्थेचे संस्थापक फोर्ब्स यादी मध्ये समाविष्ट झालेल्या सारंग बोबडे यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे यांनी केले तर अहवाल वाचन कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी केले. चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीने केलेल्या प्रमुख आंदोलनाचा आढावा श्रीहरी शेंडे यांनी घेतला.
कार्यक्रमात विविध वक्त्यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 1982 ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागु करणे, 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्ती सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागु असलेली अंशदान निवृत्ती वेतन योजना/राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना रद्द करून 1982 ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागु करणे. जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागु करणे आणि या मागण्यासह विविध मागण्यावर या अधिवेशनात मार्गदर्शन करण्यात आले.
अमृतमहोत्सवी अधिवेशनाला जिल्ह्यातील प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनीनी बहुसंख्येने अधिवेशनाला उपस्थित होते. आयोजनासाठी जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, कार्यवाह श्रीहरी शेंडे, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, कोशाध्यक्ष दिगांबर कुरेकार, उपाध्यक्ष सुनील शेरकी, गंगाधर कुनघाडकर, नामदेव ठेंगणे, अनिल कंठीवार नितीन जिवतोडे शालीक ढोरे, मनोज वासाडे, दिपक धोपटे, मंजूशा धाईत, सोनाली दांडेकर, अतिक कुरेशी, वसुधा रायपुरे, मारोतराव अतकरे, प्रमोद कोंडलकर, देवराव निब्रड, श्रीराम भोयर, गुरूदास चौधरी, सचिन तपासे, रामदास आलेवार, धनंजय राऊत, रंजना किन्नाके, प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे, प्रा. अनिल डहाके, प्रभाकर पारखी, आनंद चलाख यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र बल्की, सुरेखा मोरे यांनी केले आभार दिगंबर कुरेकर यांनी मानले.
Amrutmahotsavi district level annual convention of Vidarbha Madhyamik Shikshak Sangh