संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२५ जानेवारी:-
६३ अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघात सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून व
जिल्हास्तरावर सुलभरित्या निवडणूक पार पाडण्यासाठी उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल ,बाराव्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 25 जानेवारी रोज मंगळवारला अर्जुनी मोरगाव चे तहसिलदार विनोद मेश्राम यांचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया नयना गुंडे यांनी सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन केले आहे. याबरोबरच,उपविभागीय अधिकारी गोंदिया विश्वास शिरसाट ,
नायब तहसीलदार तहसील कार्यालय गोंदिया आर.ए. पालांदुरकर यांचे पार पडलेल्या निवडणूक कार्याबाबत सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन केले आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणूक २०२१ या अनुषंगाने दिनांक २१ डिसेंबर ,१८ जानेवारी रोजी मतदान व दिनांक १९ जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली आहे. निवडणुकीत प्रक्रियेची प्रसिद्धी मतदान मतमोजणी हे महत्त्वाचे टप्पे असून लोकशाहीच्या या पर्वात प्रत्येक मतदारास त्याचा मतदानाचा हक्क बजावता येईल तसेच जनतेने उत्साहाने व निर्भयपणे यात भाग घेऊन निवडणूक आयोगाच्या आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करून, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याची जबाबदारी प्रशासनाची होती. या कालावधीतील सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडीत असताना, उद्भवलेल्या समस्या वर मात करून अधिकाऱ्यांनी मोलाचे कार्य पार पाडले. कठीण परिश्रम व कौशल्यपूर्वक व्यवस्थापन करून, निवडणूक प्रक्रियेत कुठलेही अडथळे येऊ न देता शांततेत पार पाडले आहे. त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जुनी मोरगाव तहसीलदार विनोद मेश्राम यांचे सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन केले आहे.