खबरबात:
चंद्रपुरात हेल्मेट सक्ती होणार असे पत्र पोलिस विभाग चंद्रपुर यांच्याकडून सोमवारी जारी करण्यात आले होते. मात्र या पत्रात नेमकं कोणत्या रस्त्यांवर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे या याबद्दल काहीही माहिती देण्यात आली नव्हती.हे पत्र जारी झाल्यानंतर अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला.त्यामुळे अनेक लोक शहरात की शहराबाहेर हेल्मेट सक्ती होणार? याबद्दल संभ्रमात पडले यानंतर खबरबातने याच पत्राचा आधार घेत पोलीस विभागाला विचारणा केली असता मंगळवारी सुधारित पत्र पोलीस विभाग चंद्रपूर यांच्याकडून काढण्यात आले.या पत्रात हेल्मेट सक्ती ही शहरात नसून राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर असणार असल्याचे चंद्रपूर वाहतूक पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील यांच्याकडून काढण्यात आलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आता राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग यावर जर तुम्ही दुचाकी चालवत असाल तर
हेल्मेट लावा, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.