ओ माय गॉड! धक्कादायक । 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित
महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संपताच राज्यातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे. "काळजी घ्या कोरोनामुळे स्थिती फार वेगाने खराब होतेय. राज्याचे 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोना बाधित आहेत. सगळ्यांना नियम पाळावे लागतात स्थिती जर आणखी बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल", असं अजित पवार म्हणाले. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांचं राज्यांना पत्रं आल आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता,राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी आरोग्य विषयक सेवा सुविधा सक्षम ठेवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश देण्यात आले आहेत.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडेंना यााआधी देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे पंकजा यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंकजा यांना ओमायक्रोची लागण झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. तरीही पंकजा यांची प्रकृती ठीक असून काळजी करण्यासारखं काही नाही, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
- कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे
- अभिनेत्री मृणाल ठाकूरला कोरोनाची लागण
- मुक्ताईनगरचे आमदार आमदार चंद्रकांत पाटील कोरोनाची लागण
- बाळासाहेब थोरातही कोरोना पॉझिटिव्ह
- Harshvardhan Patil यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
- सुप्रियाताई सुळे व सदानंद सुळे सरांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह