डॉ. स्नेहल पोटदुखे यांचा मुंबई राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते 'मेडीक्वीन एक्सलन्स' पुरस्कार देऊन सत्कार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उत्कृष्ट समाजकार्यासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील २८ महिला डॉक्टरांना राजभवन येथे 'मेडीक्वीन एक्सलन्स' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या मेडीक्वीन या संस्थेतर्फे महिला डॉक्टरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात चंद्रपूर शहरातील डॉ. स्नेहल पोटदुखे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला मेडीक्वीनच्या संस्थापिका डॉ प्रेरणा बेरी - कालेकर, गोवर्धन इको व्हिलेजच्या महिला सक्षमीकरण कार्यक्रम प्रमुख डॉ संध्या सुब्रमण्यन व मेडीक्वीनच्या सचिव डॉ प्राजक्ता शाह उपस्थित होत्या.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी डॉ. ज्योती सूळ (लातूर), डॉ. जया जाणे (शिरपूर), डॉ. मिनाक्षी देसाई (मुंबई), डॉ. स्मिता घुले (पुणे), डॉ. कोमल मेश्राम (वर्धा), डॉ. अमिता कुकडे (कल्याण), डॉ. रेवती राणे (अकलूज), डॉ. अपर्णा देवईकर (चंद्रपूर), व इतर महिला डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
#Chandrapur Snehal potdukhe