Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर २२, २०२१

#चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात थुंकणे पडले महागात; दोन तासांची कोठडी सुनावली #chandrapur


चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात थुंकणे पडले महागात; दोन तासांची कोठडी सुनावली




चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या दोन नागरिकांविरोधात महानगरपालिकेच्या पथकाने चारशे रुपयांचा दंड आकारला. मा. मुख्य न्याय दंडाधिकारी एस. एम. काळे यांनी थुंकणाऱ्या नागरिकांना दोन तासांसाठी कोठडीत ठेवण्याची शिक्षा सुनावली.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. असे असतानाही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. अशांवर निर्बंध घालण्यासाठी माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या लोकांच्या सवयीला आळा घालण्यासाठी आणि मास्कची सवय लावण्यासाठी आता चंद्रपूर महानगर पालिका कठोर करीत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.