Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर ३०, २०२१

जटपुरा व पठाणपूरा गेटसह वस्त्याची नावे बदलण्याचा प्रस्ताव मनपाच्या आमसभेत नामंजूर




जटपुरा व पठाणपूरा गेटसह वस्त्याची नावे बदलण्याचा प्रस्ताव मनपाच्या आमसभेत नामंजूर


चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट पठाणपुरा गेट या ऐतिहासिक वास्तूंच्या नावासह वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यासंदर्भातील प्रस्ताव चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने नामंजूर केला.

मनपाच्या राणी हिराई सभागृहात 30 डिसेंबर रोजी महापौर राखी कंचरलावार यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली.

शहरातील वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आदेश निर्गमित केलेले आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली असून, महानगरपालिका आयुक्त यांची सदर समितीमध्ये सदस्य म्हणून नेमणुक करण्यात आलेली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात चौक , रस्ते , नगर इत्यादींना कोणतेही जातीवाचक नांवे देण्यात आलेली नाही, याबाबत कार्यालयीन पत्र दिनांक २५/०३/२०२१ अन्वये शासनास माहिती सादर करण्यात आलेली होती. मात्र, शासकीय दस्तऐवजात नोंदी नसलेले आणि समाजामध्ये प्रचलित असलेली जातीवाचक नावाच्या ठिकाणी शासकीय दस्तऐवजाप्रमाणे नावांचे नामफलक लावण्यात यावे, याबाबत कार्यवाही करण्यास कळविलेले होते. त्यानुसार  जातीवाचक नावांचे ठिकाणांची माहिती संकलित करण्यात आली.

मनपाचे कर विभाग व निवडणुक विभाग यांच्याकडून जटपूरा, पठाणपूरा माना टेकडी व बंगाली कॅम्प, शास्त्रीनगर प्रभाग ही नांवे जातीवाचक असल्याचे अभिप्राय प्राप्त झालेले आहे. तसेच स्वच्छता निरिक्षकानी गोंड वस्ती, यादव वस्ती व उडिया वस्ती, इराणी मोहल्ला आदी नावे जातीवाचक असल्याचे सादर केली. 
ही संपूर्ण नावे बदलून त्या ठिकाणी नवीन नावे देण्यास संदर्भातला विषय आज आमसभेत ठेवण्यात आला होता. मात्र, सर्व सदस्य यांनी या प्रस्तावाला विरोध करीत चंद्रपूर शहरातील कोणतीही नावे बदलण्यात येऊ नयेत, अशी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे पीठासीन अधिकारी यांनी सदर प्रस्ताव नामंजूर करण्याचे निर्देशित केले. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.