Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर ०२, २०२१

*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना अर्थसहाय्य*



*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना अर्थसहाय्य*

*राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून वरोरा तालुक्यातील 22 परिवारांना आर्थिक सहाय्य*

*लाभार्थी परिवारातील महिलांना दिवाळीनिमित्त आमदार प्रतिभाताई धानोरकरांकडून साडी भेट*


चंद्रपूर : मतदार संघातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्याकरिता आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्या नेहमी आग्रही असतात. अनेक महिन्यापासून शेतकरी आत्महत्याग्रस्त, कोरोनामुळे मरण पावलेल्या इत्यार्दी कुटुंबीय मदतीपासून वंचित होते. त्यांना मदत मिळवून त्यांना धनादेश आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.

हे अर्थसहाय्य आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यामार्फत गरजूंच्या घरी स्वतः भेट देऊन त्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये चेक व दिवाळीची भेट म्हणून साडी वितरित करण्यात आले. यावेळी त्यानिमित्ताने आमदारांनी परिवारातील कुटुंबाची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ऐन दिवाळीच्या दिवशी आमदार घरी आल्याने गरीब परिवारातील कुटुंबीयांना आनंद झाला. यावेळी घरातील परिस्थिती सांगून केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त करत होते.

यात मंगला कश्यप, वैशाली पुंजनवार, सोनी बंडू परसे, बेबी गजानन बोढे, लता भाऊराव कोंडवार, लक्ष्मी बावणे, दुर्गा ज्ञानेश्वर वाटकर, स्वाती सोनुने, प्रेमीला सिडाम, सपना चौधरी, इंदिरा निखाडे, अर्चना जवादे, सिन्धु तुराणकर, सीमा खातरकर, राधा उईके, शीला नन्नावरे, मंदा डांगे, कुंदा साखरकर, सविता दुधलकर, नीता कन्नाके, मनीषा गणेश लोडे, निरुपा डोंगरे यांच्या समावेश आहे.

लाभार्थ्यांच्या कुटुंबियांना आमदार प्रतिभाताई धानोरकर, वरोरा तहसीलदार संतोष मकवाने, नायब तहसीलदार काळे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राजेंद्र चिकटे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष मिलिंद भोयर, काँग्रेस कमिटी शहर विलास टिपले, नगरसेवक राजू महाजन, पटवारी विनोद खोब्रागडे , रवींद्र धोपटे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.

मतदार संघातील पीडित शासकीय योजनांपासून वंचित राहता कामा नये, कोणत्याही पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांना ठराविक कालावधीतच लाभ दिला जावा असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शासकीय अधिकाऱ्यांना केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.