पैठण- तालुक्यातील कुतुबखेडा येथील पन्नास वर्षीय मजुरांनी खाजगी कंपनीच्या बचत गटाकडून घेतलेलं कर्ज परतफेड होत नसल्यामुळे एका शेतकऱ्याने त्रस्त होऊन आज (सोमवारी) रोजी अकरा वाजता विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून भारत भिमराव एडके वय (५०) वर्षे असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथे सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता भारत भिमराव एडके वय ५० वर्ष रा कुतुबखेडा ता.पैठण यांनी विषारी औषध पिल्यामुळे तात्काळ गावकऱ्यांच्या मदतीने पाचोड येथील शासकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले . विषारी औषध जास्त प्रमाणावर पिल्यामुळे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सपोनि गणेश सुरवसे बीट जमादार किशोर शिंदे यांनी पंचनामा करून आत्महत्या करण्याचे कारण शोधण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान मयताच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरील व्यक्तीला गावामधील ३ एकर गायरान जमीन असून व मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उधारनिर्वाह करीत होते घरकुल योजना अंतर्गत घरकुल मिळाल्याने या घराच्या बांधकामासाठी अधिक पैशाची गरज निर्माण झाल्यामुळे गावात येणाऱ्या खाजगी कंपनीच्या बचत गटाकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड होत नसल्यामुळे त्रस्त होऊन आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या घटनेचा पुढील तपास बीट जमादार किशोर शिंदे हे करीत आहे.