Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर १२, २०२१

ठाणेदार साहेबांचं नाव समोर करून मागितली लाच:दोन पोलिसांना चंद्रपुर ACB ने केली रंगेहाथ अटक


चंद्रपूर/ललित लांजेवार:
अवैध दारूविक्री करण्यासाठी लाच मागणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील लाठी उपपोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना चंद्रपुर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 29 हजार 500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.मिलिंद पारडकर,संजू रतनकर असे लाचखोर पोलिसांचे नाव आहेत.

गोंडपीपरी तालुक्यातील लाठी परिसरात अवैध दारू विक्री सुरू ठेवण्यासाठी लाठी येथील काही पोलीस कर्मचारी 18 हजार रुपये महिना देण्यासाठी पैशाचा तगादा लावत होते.व दोन महिन्याचे 36 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.त्यानंतर लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोन्ही आरोपीना29 हजार 500 रुपयांची लाच घेताना अटक केली.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.