Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर २२, २०२१

मनपाच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग

महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग असणार की एकस सदस्य असणार यावरून गेले काही महिने चर्चा सुरू होती. अखेर याबाबत निर्णय अंतिम टप्यात आला असून आगामी महापालिका निवडणुकीसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धती असणार आहे हे स्पष्ट झाले आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धती ऐवजी ३ सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार, असे  आज (बुधवार) झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.

www.kavyashilpdigital.com


राज्यातील सुमारे 15 महापालिका निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी मुंबई महापालिका वगळता 3 नगरसेवकांचा प्रभाग करण्यावर एकमत झाले. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने 4 सदस्य पद्धतीने निवडणुक घेतली होती. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आता 3 नगरसेवकांचा एक प्रभाग असणार आहे.


आगामी महापालिकेच्या निवडणुका सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार की वॉर्डप्रमाणे याबाबत अनेक दिवस अनिश्चितता होती. ऐन वेळेवर शासन याबाबत निर्णय घेऊ शकते, असे राजकीय पक्षांचे मत होते. दरम्यान, शहराचा विस्तार वाढल्याने सीमालगतचा भाग शहरात समाविष्ट केल्यास वॉर्डाची संख्या वाढू शकते, असे झाल्यास नव्याने वॉर्ड किंवा प्रभाग रचना केली जाऊ शकते, असाही मतप्रवाह आहे. 


muncipal corporation election 2022


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.