Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१

मा.आ. नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न


औरंगाबाद -राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माजी आमदार नितिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त  राष्ट्रीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हतनूर ता. कन्नड येथे दत्ताजी भालेकेंद्र व डॉ. मनोज राठोड यांच्या यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले,  कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव अर्जुन पाटील यांनी केले. शिबिरात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला, दत्ताजी भाले रक्तकेंद्र, औरंगाबाद डॉ. निवृत्ती वानोळे, अप्पासाहेब सोमासे (जनसंपर्क अधिकारी) व टीमने  रक्त संकलन केले, तर तिरुपती हॉस्पिटल कन्नड येथील आरोग्य तपासणी डॉ. पठाण हाफिज नवाज व राजेश चव्हाण व नेत्र तपासणी डॉ. किसन धर्मु चव्हाण यांनी  केली. तर राजेंद्र पाटील, कैलास आबा अकोलकर, किशोर पवार (पंचायत समिती, सदस्य) राष्ट्रीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हतनूर, राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय, हतनूर, राष्ट्रीय कॉलेज ऑफ फार्मसी, हतनूर, राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय जैतापुर. राष्ट्रीय करिअर अकॅडमी, हतनूर. येथील प्राचार्य डॉ. के जी. शिंदे, मुख्याध्यापक श्री. एस. एस. निकम व प्राचार्य डॉ. एस. जी. खनगे, मुघ्याध्यापक श्री. जे. आर. अंभोरे व सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.