Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर २३, २०२१

निळकंठराव शिंदे महाविद्यालयात एन्ट्री इन डिफेन्स सर्व्हिसेसचे राष्ट्रीय परिसंवाद


शिरीष उगे(भद्रावती प्रतिनिधी)
              :- स्थानिक निळकंठराव शिंदे वाणिज्य व कला महाविद्यालय, शारीरिक शिक्षण विभाग तथा इंटरनल क्वालिटी इन्शुरन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पद्धतीने एन्ट्री इन डिफेन्स सर्व्हिसेस या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
           या कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसन वीर महाविद्यालय वाई,सातारा येथील संचालक तथा एनसीसीचे सहयोगी अधिकारी समीर पवार हे होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे संघटन सचिव प्रा.डॉ. विशाल शिंदे,संयोजक प्रा.डॉ. शशिकांत खित्रे, प्राचार्य डॉ. लेमराज लडके, प्रा.डॉ. कार्तिक शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.
            प्रमुख मार्गदर्शक डॉ. पवार यांनी डिफेन्स सर्व्हिसेस विषयी विस्तृत माहिती देत विविध डिफेन्स सर्व्हिसेस साठी कोण-कोणती प्रवेश पात्रता असायला पाहिजेत,आणि इंडियन आर्मी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्मी कंपनी असल्याची विस्तृत माहिती दिली.त्याचप्रमाणे डॉ. विवेक शिंदे यांनी अशा या कार्यक्रमाचे माध्यमातून समाजातील विविध संघटनांना लाभ होईल असा आशावाद आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केला.पाहुण्यांचा परिचय प्रा.संदिप प्रधान,प्रास्ताविक प्राचार्य डॉ. लेमराज लडके, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. खित्रे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. विशाल शिंदे यांनी केले.कार्यक्रमे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ. नरेन्द्र हरणे,प्रा.डॉ. खादरी यांनी परिश्रम घेतले. यामध्ये देशातील विविध राज्यातील तज्ञांनी तसेच प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभागी झाले होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.