रामटेक: श्री. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान मनसर व ग्रामीण पत्रकार संघ रामटेक यांचे संयुक्त विद्यमाने ५ सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे आयोजित कोरोना योद्धा समाजभुषण पुरस्कार * समारंभात निस्वार्थ भावनेने राष्ट्राची युवा पिढी घडविण्याचे सेवाव्रत स्विकारुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात व उज्ज्वल भवितव्यासाठी अविरत परिश्रम घेत असल्याबद्दल तसेच जनसेवेच्या प्रति कृतज्ञता व प्रेम बाळगून मानवसेवेच्या राष्ट्रीय कार्यात अमूल्य योगदान दिल्याबद्दल *प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन येथील मुख्याध्यापक मिलिंद विठ्ठलराव वानखेडे यांना कोरोना योद्धा समाजभुषण पुरस्कार मा. चंद्रपाल चौकसे, मा. राकेश मर्जिवे, नागपूर जिल्हयाचे मुख्य कार्यपालन अधिकारी मा. योगेश कुंभेजकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, तहसिलदार बाळासाहेब मस्के, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार, पोलीस अधिकारी विवेक सोनवणे, ॲड. महेंद्र येरपुडे, यांचे शुभ हस्ते कोरोना योद्धा समाजभुषण पुरस्कार २०२०-२१ सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाला ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी, विविध मान्यवर डॉक्टर, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
Milind wankhede Samajbhushan