Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर ३०, २०२१

देवपुडी येथील धरणातील पाण्याचे जलपूजन


औरंगाबाद:- 
देवपुडी ता. कन्नड येथील लघु सिंचन प्रकल्प, देवपुडी धरणातील पाण्याचे सरपंच सौ. सुरेखा रोरे व उपसरपंच सौ. दिपाली वेताळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास सर्व तलाव, धरणे भरले आहे, नुकसानदायक पाऊस होत असल्याने सर्वच मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तलावाला पाण्याची आवक कमी असल्याने  या धरणात अंदाजे 75 टक्के पाणी साठा झाल्याने परिसरातील शेतकरी सुखावले आहे. जलपूजन कार्यक्रमासाठीकारभारी गायकवाड, सतीश मालोदे, पवन वेताळ, जयदीप वेताळ, प्रभू बडोगे, शेषराव रोरे, बाबासाहेब वरणे, पिंपळगाव (दिवशी) चे माजी सरपंच श्री. संतोष जाधव, विटखेडा येथील मच्छिन्द्र बडोगे, व देवपुडी, पिंपळगाव (दी.)  विटखेडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.