Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर १४, २०२१

तुम्हाला कोणाचा स्टेटस आवडला पण डाऊनलोड करता येत नाही, नो प्रॉब्लेम!

 तुम्हाला कोणाचा स्टेटस आवडला पण डाऊनलोड करता येत नाही, नो प्रॉब्लेम!


तुमच्या बाबतीत असे बरयाच वेळा झाले असेल की तुम्ही व्हॅाटसअपवर कोणाचे तरी स्टेटस पाहत असता, मग तुम्हाला ते आवडते पण डाऊनलोड तरता येत नाही. मग तुम्ही काय करता तर फोटो असेल तर स्क्रीनशॉट मारता पण व्हिडिओ असेल तर......गप्प बसावे लागते.लक्षात घेऊन एक नवीन ट्रिक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या ट्रिकने तुम्ही तुमच्या लिस्टमधील जे Whatsapp स्टेटस आवडलं ते डाऊनलोड करू शकता. ही प्रक्रियाही खूप सोपी आहे. तुम्हाला त्यामुळे आता आवडलेलं स्टेटस सहज डाऊनलोड करता येणार आहे. 

तुम्हाला कोणाचा स्टेटस आवडला पण डाऊनलोड करता येत नाही, नो प्रॉब्लेम!

. ही युक्ती व्हॉट्सअॅपचं स्टेटस डाऊनलोड करायची आहे. Whatsaapp च्या स्टेटसवर फोटो-व्हिडीओ खूप सहजपणे डाउनलोड करू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी Appची गरज भासणार नाही. 

व्हॉटसअप स्टेटसवरील स्टोरी या २४ तासानंतर आपोआप गायब होतात. इतकच नाही तर तुमच्याकडे जे फोननंबर्स आहेत त्यांच्याच स्टोरी तुम्ही पाहू शकणार आहात. आता तुम्हाला आवडलेली स्टोरी डाऊनलोड करायची असेल तर  असे करा.

👉 पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या फाइल मॅनेजरवर जा.

👉 तेथे WhatsApp नावाच्या फोल्डरवर जा.

👉 तिथे तुम्हाला स्टेटस ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

👉 तुम्हाला व्हॉट्सअप स्टेटसवर दिसणारे फोटो आणि व्हिडिओ दिसतील.

👉 आता आपण डाउनलोड करायचा असलेला फोटो किंवा व्हिडीओ निवडा.

👉 आता तुम्हाला निवडलेला फोटो किंवा व्हिडीओवर क्लिक केल्यावर तुम्हाला डाऊनलोडचा पर्याय येईल

👉 या पर्यायावर क्लिक करा. डाऊनलोड झालेले फोटो आणि व्हिडीओ तुमच्या मोबाईल गॅलरीमध्ये दिसतील.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.