*भारतीय मानक ब्यूरो नागपुर तर्फे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण
शिरीष उगे भद्रावती/प्रतिनिधी
: दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी ग्राहक पंचायत भद्रावती यांनी "हॉलमार्किंग जागरूकता, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला "भारतीय मानक ब्यूरो, नागपुर" यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणकरिता प्राचारण करण्यात आले होते.
१६ जुन २०२१ पासुन सोन्याच्या दागिन्यांवर आणि सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले होते. परंतु हॉलमार्किंग विषयी ग्राहक आणि ज्वेलर्स यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेवुन ग्राहक पंचायत भद्रावती यांनी भारतीय मानक ब्यूरो, नागपुर यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणकरिता प्राचारण केले.
यावेळी ग्राहक आणि ग्राहक संरक्षण कायदा २०१९ याबद्दल विशेष माहीती भारतीय मानक ब्यूरो, नागपुरचे अधिकारी मा. सर्वेश त्रीवेदी यांनी दिली. भारतीय मानक ब्यूरो आणि त्यांच्या कार्याविषयी संपुर्ण माहीती भारतीय मानक ब्यूरो, चे अधिकारी मा. पियुश वासेकर यांनी दिली. भारतीय मानक ब्यूरो, नागपुर चे हेड मा. विजय नितनवरे यांनी आय. एस. आय. आणि बी.एस.आय. प्रमाणपत्र आणि त्यामध्ये येणा-या विविध उत्पादनाची माहीती दिली.
उपस्थित ज्वेलर्सना एच.यु.आयडी., हॉलमार्किंग प्रमाणपत्रासाठी रजिस्ट्रेशन, ऑनलाईन पोर्टल याबद्दल सविस्तर माहीती देण्यात आली.
प्रशिक्षणानंतर प्रश्न उत्तराचा कार्यक्रम छान रंगला. ग्राहकांनी, ज्वेलर्स, उपस्थित अनेक लोकांनी हॉलमार्किंग विषयी भारतीय मानक ब्यूरोच्या अधिकार्यांना अडचनी आणि प्रश्न विचारले. त्याचे उत्तर देवुन अधिकार्यांनी त्यांचे समाधान केले.
ग्राहक पंचायत भद्रावती यांचे कडुन भारतीय मानक ब्यूरो, नागपुर यांना सन्मान चिन्ह आणि सर्वांना शाल श्रीफळ देऊन त्यांच्या कार्याबद्दल गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पुरूषोत्तम मत्ते, प्रमुख पाहुणे मा. महेश शितोळे साहेब तहसीलदार भद्रावती, मा. गजानन पांडे संघटन मंत्री विदर्भ प्रांत, ग्राहक पंचायत नागपुर, डॉ. माला प्रेमचंद, सुनिता खंडाळकर, कल्याणी मुटे, किशोर मुटे यांची उपस्थिति होती.
कार्यक्रमाला भद्रावती शहरातील ग्राहक, अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती शाखेचे संपुर्ण पदाधिकारी, पत्रकार आणि भद्रावती ज्वेलर्स असोशिएशनचे पदाधिकारी आणि ज्वेलर्स यांची उपस्थिति होती.
कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून दिल्या बद्दल डॉ. विवेक शिंदे साहेब आणि शिंदे महाविद्यालय, भद्रावती यांनी विषेश सहकार्य केल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वसंत व-हाटे, वामन नामपल्लीवार, पुरूषोत्तम मत्ते, अशोक शेंडे, प्रविण चिमुरकर, गुलाब लोणारे, गोपिचंद कांबळे, शेखर घुमे, उत्तम घोसरे यांनी अथक परिश्रम घेतले.